Happy Birthday Shabana Azmi: जावेद अख्तर यांच्याआधी या अभिनेत्यावर फिदा होत्या शबाना आझमी

Happy Birthday Shabana Azmi: जावेद अख्तर यांच्याआधी या अभिनेत्यावर फिदा होत्या शबाना आझमी

बॉलिवूडमध्ये अनेक दिग्गज अभिनेत्यांबरोबर काम करणाऱ्या शबाना या खऱ्या आयुष्यात मात्र शशी कपूर (Shashi Kapoor) यांच्या मोठ्या फॅन होत्या.

  • Share this:

मुंबई, 18 सप्टेंबर : बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री आणि संगीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांच्या पत्नी शबाना आझमी (Shabana Azmi) यांचा आज वाढदिवस आहे. शबाना या प्रसिद्ध लेखक आणि शायर कैफी आझमी यांच्या कन्या. शबाना यांचा जन्म 18 सप्टेंबर 1950 रोजी झाला. आज शबाना आझमी 70वा वाढदिवस साजरा करत आहेत.

आपल्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केली असून आपल्या आईमुळं त्या बॉलिवूडकडे वळल्या होत्या. वाढदिवशी त्यांच्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी आम्ही तुमच्याशी शेअर करणार आहोत. बॉलिवूडमध्ये अनेक दिग्गज अभिनेत्यांबरोबर काम करणाऱ्या शबाना या खऱ्या आयुष्यात मात्र शशी कपूर (Shashi Kapoor) यांच्या मोठ्या फॅन होत्या. या दोघांनी एकाच चित्रपटामध्ये एकत्र काम देखील केलं आहे. 'फकीरा' या सिनेमात दोघांनी एकत्र काम केलं होतं.

अंकुरमधून केलं पदार्पण

आपल्या बॉलिवूड कारकिर्दीची सुरुवात त्यांनी 'अंकुर' या सिनेमातून केली होती. 1974 मध्ये आलेला हा सिनेमा हिट ठरला होता. यामध्ये त्यांनी मोलकरणीची भूमिका साकारली होती.

(हे वाचा-Tiger 3: सात देशात होणार सलमान खानच्या या बिग बजेट सिनेमाचं शूटिंग)

याकरता शबाना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता. त्याचबरोबर शबाना यांनी त्यांच्या कारकिर्दीत आतापर्यंत चार वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळवला असून त्यांना विविध प्रकारचे इतर पुरस्कार मिळाले आहेत.

View this post on Instagram

Photo by #Boman Irani

A post shared by Shabana Azmi (@azmishabana18) on

जया बच्चन यांच्यापासून प्रेरणा

बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी आपल्याला जया बच्चन यांच्याकडून प्रेरणा मिळाल्याचं शबाना आझमी सांगतात. एका मुलाखतीमध्ये त्यांनी याविषयी बोलताना सांगितले कि, 'फिल्म एंड टेलीव्हिजन इंस्टीट्यूट ऑफ इंडिया' यांनी बनवलेल्या सिनेमात जया बच्चन यांचा अभिनय पाहून मी पुण्यात येण्याचा निर्णय घेतला होता.

(हे वाचा-सौरव गांगुलीचा हृतिकला सल्ला, बायोपिकमध्ये त्याची भूमिका करायची असेल तर...)

गीतकार जावेद अख्तर यांच्याशी लग्न करण्याआधी शबाना या शेखर कपूर यांच्याबरोबर रिलेशनशिपमध्ये होत्या. काही कारणामुळं दोघं वेगळे झाले आणि त्यानंतर शबाना यांनी जावेद यांच्याबरोबर लग्न केलं.

Published by: Janhavi Bhatkar
First published: September 18, 2020, 3:46 PM IST

ताज्या बातम्या