Tiger 3: सात देशात होणार सलमान खानच्या या बिग बजेट सिनेमाचं शूटिंग

Tiger 3: सात देशात होणार सलमान खानच्या या बिग बजेट सिनेमाचं शूटिंग

सलमान खानच्या या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केली. आता 'टायगर'चे निर्माते YRF पुन्हा नव्या कथेसह प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाले आहेत.

  • Share this:

मुंबई, 18 सप्टेंबर : बॉलिवूडचा दबंग सलमान खानच्या (Salman Khan) टायगर सीरिजचे दोन पार्ट प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. या दोन्ही सिनेमांचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले. दोन्ही चित्रपट हिट ठरले. 'एक था टायगर' आणि 'टायगर जिंदा है' हे दोन्ही चित्रपट सलमानच्या चाहत्यांनी डोक्यावर घेतले होते. दरम्यान या टायगर सीरिजचे निर्माते आता त्याच्या पुढच्या भागाची तयारी करत आहेत.

सलमान खानच्या या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केली. आता 'टायगर'चे निर्माते पुन्हा नव्या कथेसह प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाले आहेत. एका अहवालानुसार या चित्रपटाचे शूटिंग 7 देशांमध्ये केले जाण्याची योजना आहे, ज्यात आतापर्यंत तुर्की, अमेरिका आणि युएईची या देशांची नावं समोर आली आहेत. ज्या देशात शूटिंग करण्याची योजना आखली आहे त्याठिकाणी कोरोनामुळे शूटिंग करता येईल का याबाबत निर्माते विचार करत आहेत. या सिनेमाची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.

(हे वाचा-'उर्मिला मातोंडकर सॉफ्ट पॉर्न स्टार', कंगना रणौतने उधळली मुक्ताफळं)

एका वृत्तपत्राने दिलेल्या अहवालानुसार, टायगर -3 साठी सलमान खान आणि आदित्य चोप्रा (Aditya Chopra) यांनी काही मोठ्या योजना आखल्या आहेत. आदित्य चोप्रा आणि दिग्दर्शक मनिष शर्मा या सिनेमाच्या कथानकाला अंतिम रूप देत आहेत. दरम्यान सलमान खान फेब्रुवारी महिन्यातील शूटच्या तारखा जुळवण्याचा प्रयत्न करीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाचे चित्रीकरण सात देशांमध्ये केले जाणार आहे. Visually आनंद देणारा हा सिनेमा करण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न असेल.

टायगर सीरिजमधील आधीच्या दोन्ही सिनेमांप्रमाणे यामध्ये देखील सलमान खान मुख्य भूमिकेत असणार आहे, तर कतरिना कैफ लीड अभिनेत्री असणार आहे. यामध्ये खलनायकाची भूमिका कोण साकारणार हे अद्याप निश्चित व्हायचे आहे. निर्माते यावर काम करत आहेत. या चित्रपटाची घोषणा 27 सप्टेंबर रोजी केली जाऊ शकते. कारण या दिवशी YRF ला 50 वर्षे पूर्ण होत आहेत.

(हे वाचा-वाद पेटला! उर्मिलाचं 'पंगा' गर्ल कंगनाला खुलं चॅलेंज; आता तर हे करुनच दाखव!!!)

100 कोटी मानधन घेणार सलमान खान

टायगर- 3 च्या  निर्मितीवर 200 ते 250 करोड रुपयाचा खर्च केला जाणार आहे. स्पॉटबॉयने याबाबत वृत्त दिले आहे. आतापर्यंतच्या बॉलिवूड इतिहासातील सर्वाधित किंमत खर्च करून हा सिनेमा बनवला जाणार आहे. चित्रपटाच्या  प्रिंट आणि पब्लिसिटीवर 20 ते 25 रुपये खर्च केले जाणार आहेत. या अहवालानुसार या सिनेमासाठी सलमान खान 100 करोड इतके मानधन घेणार आहे. त्याचबरोबर सिनेमातून मिळणाऱ्या नफ्यामध्ये देखील त्याचा वाटा असणार आहे. एकंदरित सर्व खर्च पाहता या फिल्मसाठी 350 कोटी खर्च होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे हा सिनेमा सर्वात महागडा सिनेमा ठरणार आहे.

2017 साली आलेला 'टायगर जिंदा है ' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. या सिनेमाने 400 कोटींचा व्यवसाय केला होता. भारतात या सिनेमाने  339.96 कोटींची कमाई केली होती.

Published by: Janhavi Bhatkar
First published: September 18, 2020, 10:12 AM IST

ताज्या बातम्या