मराठी चित्रपटांमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी अभिनयाची सुरवात टीव्ही मालिकांमधून केली. मात्र नंतर त्यांनी चित्रपटांमध्ये मोठी प्रसिद्धी मिळवली. आता हेच कलाकार पुन्हा एकदा मालिकांकडे वळले आहेत. मराठीतील अनेक प्रसिद्ध कलाकारांनी मालिकांमध्ये पुनरागमन केलं आहे.
अभिनेता अंकुश चौधरीने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. बऱ्याच वर्षानंतर त्याने 'मी होणार सुपरस्टार' या शोमधून छोट्या पडद्यावर पुन्हा एन्ट्री केली आहे.
ज्येष्ठ अभिनेता विजय कदम यांनी अनेक वर्षांनंतर झी मराठीवरील 'ती परत आलीय' या मालिकेतून पुनरागमन केलं आहे.
अभिनेत्री प्रार्थना बेहरेने 'पवित्र रिश्ता' या हिंदी मालिकेतून आपली मन जिंकली होती. त्यांनतर ती चित्रपटांकडे वळली होती. आत्ता पुन्हा एकदा ती 'तुझी माझी रेशीमगाठ' मालिकेतून परत आली आहे.
अभिनेत्री मुक्ता बर्वेनेसुद्धा टीव्हीवर पुनरागमन केलं आहे. उमेश कामतसोबत 'अजूनही बरसात आहे' या मालिकेत ती झळकली आहे.
तर काही महिन्यांपूर्वी भरत जाधव यांनीसुद्धा 'सुखी माणसाचा सदरा' या मालिकेतून टीव्हीवर पुन्हा एन्ट्री केली होती.
अभिनेता श्रेयस तळपदेसुद्धा छोट्या पडद्यावर परतला आहे. प्रार्थना बेहरेसोबत 'तुझी माझी रेशीमगाठ' या मालिकेत श्रेयस दिसणार आहे.
तर ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णीसुद्धा ;स्वराज्य जननी जिजामाता' मालिकेतून टीव्हीवर परतल्या होत्या.