मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /याच दिवशी अमिताभ बच्चन यांना मिळालं होतं नवं आयुष्य; 'कुली' अपघाताची 39 वर्षे

याच दिवशी अमिताभ बच्चन यांना मिळालं होतं नवं आयुष्य; 'कुली' अपघाताची 39 वर्षे

2 ऑगस्ट याच दिवशी 1982मध्ये ‘कुली’ (Coolie) चित्रपटाच्या सेटवर त्यांचा अपघात (Accident) झाला होता.

2 ऑगस्ट याच दिवशी 1982मध्ये ‘कुली’ (Coolie) चित्रपटाच्या सेटवर त्यांचा अपघात (Accident) झाला होता.

2 ऑगस्ट याच दिवशी 1982मध्ये ‘कुली’ (Coolie) चित्रपटाच्या सेटवर त्यांचा अपघात (Accident) झाला होता.

    मुंबई, 3 ऑगस्ट: बॉलिवूडचा (Bollywood) शहेनशहा, बिग बी (Big B) अशी ओळख असणारे अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) आज वयाच्या पंचाहत्तरीतही अभिनय क्षेत्रात सक्रीय आहेत. सुसंस्कृत व्यक्तीमत्त्व, भारदस्त आवाज आणि उत्तम अभिनयाच्या बळावर अमिताभ बच्चन आजही चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. जगभरात त्यांचे असंख्य चाहते (Fans) आहेत. 11 ऑक्टोबर रोजी त्यांचा वाढदिवस (Birthday) असतो. देशभरातील चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करतात; मात्र त्यांचे चाहते आणखी एका दिवशी त्यांचा वाढदिवस (Amitabh Bachchan’s Second Birthday) साजरा करतात. हा दिवस आहे 2 ऑगस्ट याच दिवशी 1982मध्ये ‘कुली’ (Coolie) चित्रपटाच्या सेटवर त्यांचा अपघात (Accident) झाला होता. आज 39 वर्षांनंतरही त्या अपघाताच्या आठवणी रसिकांच्या आणि अमिताभ बच्चन यांच्या मनात ताज्या आहेत.

    या चित्रपटात अमिताभ बच्चन स्वतः स्टंट करत होते. एका सीनमध्ये हा अपघात झाला आणि ते बेशुद्धच पडले. त्याच अवस्थेत त्यांना आधी सेंट फिलोमिना हॉस्पिटलमध्ये आणि त्यानंतर लगेच मुंबईतील (Mumbai) ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांना क्लिनिकली डेड घोषित केलं होतं; या बातमीनं सारा देश हळहळला. अमिताभ बच्चन बरे व्हावेत यासाठी देशभरातील त्यांच्या चाहत्यांनी प्रार्थना केली. उपवास, नवस बोलले गेले. सगळ्यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि त्यांचा जणू पुनर्जन्मच झाला. अमिताभ बच्चन यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या आणि तब्बल दोन महिन्यांनी 24 सप्टेंबर रोजी ते यातून बरे होऊन घरी आले.

    (हे वाचा: HBD: रेडिओ ते कॉमेडी किंग; 'गुत्थी' फेम सुनील ग्रोवरचा थक्क करणारा प्रवास)

    ते दरवर्षी या अपघाताची आणि चाहत्यांच्या प्रेमाची आठवण काढतात. चाहत्यांच्या उंदड प्रेमामुळेच आपण या संकटातून वाचलो असा त्यांचा विश्वास आहे, त्यामुळे ते चाहत्यांचे कृतज्ञतापूर्वक आभार व्यक्त करतात. यंदाही या आठवणींना उजाळा देत बिग बींनी आपल्या ब्लॉगवर चाहत्यांचे आभार व्यक्त केले आहेत. ‘ज्यांनी आज 2 ऑगस्ट रोजी प्रेम आणि शुभेच्छा व्यक्त केल्या त्याबद्दल आभार आणि प्रेम. चाहत्यांनी व्यक्त केलेली चिंता, त्यांनी केलेली प्रार्थना पाहणे, ऐकणे हा एक जबरदस्त अनुभव आहे. मला खूप धन्य वाटते. धन्यवाद.’

    (हे वाचा:नवाजुद्दीन सिद्दीकी सोडणार भारत? पत्नी आलिया म्हणाली, ‘आम्ही...’  )

    यावेळी त्यांनी त्यांचे दिवंगत वडील आणि प्रसिद्ध कवी हरिवंशराय बच्चन यांनी हॉस्पिटलमधून परत आल्यावर कशी प्रतिक्रिया दिली होती. याची आठवण आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केली असून, त्यावेळचा एक फोटो दिला आहे. अमिताभ यांनी लिहिले आहे की, ‘कुली’ चित्रपटाच्या त्या अपघातानंतर मृत्यूवर मात करून मी घरी परत आलो तो हा क्षण आहे. माझ्या वडिलांना असं कोसळून गेलेलं मी पहिल्यांदाच पाहिलं होतं. छोटा अभिषेकही (Abhishek Bachchan) काळजीत असलेला इथं दिसतो. सोशल मीडियावर त्यांनी एक व्हिडीओही शेअर केला आहे. यामध्ये अमिताभ बच्चन कारमधून उतरून आपले वडील हरिवंशराय बच्चन यांच्या पायांना स्पर्श करून नमस्कार करताना आणि नंतर त्यांना घट्ट मिठी मारताना दिसतात. सोबत अमिताभ बच्चन यांच्या पत्नी जया बच्चनदेखील (Jaya Bachchan) दिसतात.

    First published:

    Tags: Amitabh Bachchan, Bollywood actor