मुंबई, 7 एप्रिल- सन 2020 हे वर्ष सर्वच दृष्टींनी अतिशय वाईट असं वर्ष ठरलं होतं. या वर्षात कोरोना(corona pandemic) साथीने हाहाकार माजवला होता. तर दुसरीकडे बॉलीवूडमधील (bollywood actors death) अनेक कलाकार पडद्याआड (bollywood death) गेले. अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या (sushant singh rajput suicide)आत्महत्येने तर संपूर्ण देशाला हादरवून सोडलं होतं. सुशांतच्या मृत्यूसंदर्भातला तपास अजूनही सुरू आहे. त्यातच सोशल मीडियावर आणखी एक बातमी फिरू लागली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक रामगोपाल वर्मा (ram gopal verma) सुशांतसिंह राजपूतवर चित्रपटाची निर्मिती करणार असल्याची ही बातमी आहे. 14 जूनला सुशांतचा मृत्यू झाला होता. त्यानंतर बॉलीवूड संपूर्ण हादरून गेलं होतं. सुशांतची आत्महत्या की खून, कोण होतं त्याच्या मृत्यूला जबाबदार असे अनेक प्रश्न उपस्थित झाले. आरोप-प्रत्यारोप झाले. यावेळी अनेक वादविवादांना वाचा फुटली होती. या केसच्या तपासात बॉलिवूडचं ड्रग कनेक्शनही उघड झालं. सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगल्या. या प्रकरणात सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला अटकदेखील करण्यात आली होती. रियावर अनेक आरोप लावले गेले होते. यातूनच बॉलीवूडमधील ड्रग्सच्या मुद्द्याला देखील वाचा फुटली होती. आणि यावरूनच रियाला अटक करण्यात आली होती. सध्या रिया जामीनवर बाहेर आहे. या काळात अंकिता लोखंडे आणि सुशांतसिंह राजपूतचं जुनं प्रेमप्रकरण देखील चांगलचं चर्चेत आलं होतं. तसंच बॉलीवूडमधील घराणेशाही हा वाद सुद्धा चव्हाट्यावर आला होता.
सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या चाहत्यांना सुद्धा मोठा धक्का बसला होता. सुशांतचे चाहते सतत सोशल मीडियावर व्यक्त होतं असतात. आणि सुशांतच्या मृत्यूला जबाबदार धरलेल्या कलाकारांवर सतत आपला रोष काढत असतात. चाहते सतत सोशल मीडियावर सुशांतच्या आठवणीत त्याच्या पोस्ट करत असतात. त्याच्याबद्दल लिहून व्यक्त होतं असतात. आत्ता याचदरम्यान दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी एका इंग्रजी वेबसाईटला मुलाखतदेताना म्हटलं आहे, की ते लवकरच एका दिवंगत अभिनेत्यावर चित्रपट काढणार आहेत. सुशांतबद्दल बोलताना त्यांनी म्हटलं आहे की, या प्रकरणातील आणखीन मुद्द्यावरसुद्धा ते प्रकाश टाकू इच्छितात. (हे वाचा: एकेकाळी होता सुपरस्टार; ऐश्वर्या रायचा पडद्यावरील हा ‘हिरो’ सध्या काय करतोय? ) रामगोपाल वर्मा यांना विचारण्यात आलं होतं. सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण आणि त्यातील राजकीय हस्तक्षेप आणि नंतर आलेलं ड्रग्स प्रकरण यामुळे एक चांगली पटकथा तुम्ही बनवू शकता का? यावर यावर रामगोपाल यांनी म्हटलं आहे. हे होऊही शकतं किंवा नाहीही. कारण यामध्ये मला निवडण्यासाठी बऱ्याच इतर गोष्टी आहेत. मी हेसुद्धा मुद्दे घेऊ शकतो मात्र पूर्ण काळजी घेऊन. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुशांतसिंह राजपूतच्या प्रकरणात ट्रोल होतं असलेल्या रिया चक्रवर्तीला राम गोपाल वर्मा यांनी समर्थन दर्शवलं होतं.