जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Breaking: अभिनेता अरमान कोहलीला अटक! Drug Case मध्ये छापेमारीनंतर NCB ची कारवाई

Breaking: अभिनेता अरमान कोहलीला अटक! Drug Case मध्ये छापेमारीनंतर NCB ची कारवाई

Breaking: अभिनेता अरमान कोहलीला अटक! Drug Case मध्ये छापेमारीनंतर NCB ची कारवाई

Bollywood Drug Case: बॉलिवूड अभिनेता आणि बिग बॉस 7 चा स्पर्धक राहिलेल्या अरमान कोहलीला (Armaan Kohli) त्याच्या जुहू स्थित घरातून अटक करण्यात आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 29 ऑगस्ट: बॉलिवूड अभिनेता आणि बिग बॉस 7 चा स्पर्धक राहिलेल्या अरमान कोहलीला (Armaan Kohli) त्याच्या जुहू स्थित घरातून अटक करण्यात आली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) छापेमारी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. अभिनेता अरमान कोहलीच्या घरातून ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. एनसीबीच्या मुंबई ब्रांचद्वारे ही कारवाई करण्यात आली असून शनिवारी अरमान कोहली आणि त्याचा मित्र अजय राजू सिंग यांच्यासह अनेक लोकेशन्सवर छापेमारी करण्यात आली. यावेळी 25 ग्रॅम एमडी (recovered small Quantity of Cocaine drug) जप्त करण्यात आले होते. छापेमारीमध्ये आढळलेल्या ड्रग आणि अन्य काही पुराव्यांआधारे ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. NCB कडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात समीर वानखेडे (Sameer Wankhede IRS, Zonal Director, NCB MZU) यांनी असे म्हटले आहे की, NCB ने केलेल्या छापेमारीमध्ये 28 तारखेला हाजीअलीजवळ ड्रग पेडलर अजय राजू सिंग याच्याकडून 25 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले. आरोपी अजय राजू सिंहच्या प्राथमिक चौकशीच्या आधारे शनिवारी दुपारी फॉलोअप ऑपरेशन सुरू करण्यात आले. त्याने दिलेल्या माहितीनुसार एनसीबीच्या मुंबई टीमने अंधेरीमध्ये अरमान कोहलीच्या घरावर छापा टाकला आणि त्याच्याकडून कोकेन जप्त करण्यात आले. हे वाचा- Mission Impossible केलं पॉसिबल, Tom Cruise शूटिंगमध्ये असताना चोरली BMW एनसीबीने या ड्रग प्रकरणात क्राइम नं. 82/21 दाखल केला आहे. एनडीपीएस कायद्याअंतर्गत (NDPS Act) अरमान कोहलीला 21(ए), 27(ए), 28, 29, 30, आणि 35 या कलमांअंतर्गत अटक करण्यात आली आहे. तर NDPS Act अंतर्गत अजय राजू सिंग याला 22बी(ए), 27ए, 28, 29, 30 आणि 35 या कलमाअंतर्गत अटक करण्यात आली आहे. या ड्रग केसमध्ये आंतरराष्ट्रीय कनेक्शनही समोर आलं आहे, कारण जप्त करण्यात आलेले कोकेन साउथ अमेरिकन ओरिजीनचे आहे. हे कोकेन कोणत्या मार्गाने मुंबईत आणले गेले, यामधील दुवे काय आहेत आणि इतर तस्करांबाबतचा शोध मुंबई एनसीबी करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात