मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Mission Impossible चोरट्यांनी केलं 'पॉसिबल', Tom Cruise शूटिंगमध्ये असताना चोरली BMW; जवळपास 1 कोटींचं सामान गायब

Mission Impossible चोरट्यांनी केलं 'पॉसिबल', Tom Cruise शूटिंगमध्ये असताना चोरली BMW; जवळपास 1 कोटींचं सामान गायब

Tom Cruise त्याच्या रोमांचक स्टंट्ससाठी ओळखला जातो. सिनेमात कोणीही शत्रू त्याच्यापुढे टिकू शकत नाही. प्रत्यक्षात मात्र त्याच्याबाबतीत नुकतीच अशी घटना घडली आहे, की ती कशी घडली, याचा कुणालाच अंदाज बांधता येत नाहीये.

Tom Cruise त्याच्या रोमांचक स्टंट्ससाठी ओळखला जातो. सिनेमात कोणीही शत्रू त्याच्यापुढे टिकू शकत नाही. प्रत्यक्षात मात्र त्याच्याबाबतीत नुकतीच अशी घटना घडली आहे, की ती कशी घडली, याचा कुणालाच अंदाज बांधता येत नाहीये.

Tom Cruise त्याच्या रोमांचक स्टंट्ससाठी ओळखला जातो. सिनेमात कोणीही शत्रू त्याच्यापुढे टिकू शकत नाही. प्रत्यक्षात मात्र त्याच्याबाबतीत नुकतीच अशी घटना घडली आहे, की ती कशी घडली, याचा कुणालाच अंदाज बांधता येत नाहीये.

टॉम क्रूझ (Tom Cruise) कोणाला माहिती नाही बरं! हॉलिवूडमधला हा अभिनेता त्याच्या रोमांचक स्टंट्ससाठी ओळखला जातो. सिनेमात कोणीही शत्रू त्याच्यापुढे टिकू शकत नाही. प्रत्यक्षात मात्र त्याच्याबाबतीत नुकतीच अशी घटना घडली आहे, की ती कशी घडली, याचा कुणालाच अंदाज बांधता येत नाहीये. त्याच्या आलिशान आणि अत्याधुनिक बीएमडब्ल्यू कारची (BMW Car) चोरी झाली. कार थोड्या वेळाने परत मिळाली; मात्र त्यातलं तब्बल एक लाख पौंड म्हणजेच सुमारे एक कोटी रुपयांहून अधिक किमतीचं सामान चोरीला गेलं आहे. टॉम क्रूझची सुरक्षाव्यवस्था एकदम कडक आहे. शिवाय बीएमडब्ल्यू कार्स अत्यंत सुरक्षित आणि तांत्रिकदृष्ट्या अत्यंत सरस मानल्या जातात; मात्र चोरांनी ही सुरक्षाव्यवस्था भेदून आणि उच्च तंत्रज्ञान वापरून ही चोरी केली. विरोधाभास आणि योगायोगाची गोष्ट अशी, की 'मिशन इम्पॉसिबल 7' या सिनेमाचं शूटिंग (Mission Impossible 7) सुरू असताना ही 'हायली इम्पॉसिबल' गोष्ट 'पॉसिबल' करण्यात चोरट्यांना यश मिळालं. द सनने याबाबत वृत्त दिलं आहे

बर्मिंगहॅममध्ये (Birmingham) ही घटना घडली. ही घटना घडल्याचं कळल्यानंतर टॉमसह 'मिशन इम्पॉसिबल 7' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र असलेल्या टीममधले सगळेच कलावंत आश्चर्यचकित झाले. या सिनेमात अभिनेत्री Hayley Atwell काम करत आहे. टॉम आपल्या बॉडीगार्डच्या BMW X7 या कारमधून प्रवास करत होता. ही कार बर्मिंगहॅमच्या ग्रँड हॉटेलच्या बाहेर पार्किंग लॉटमध्ये उभी करण्यात आली होती. त्या हॉटेलच्या जवळपासच्या भागातच सिनेमाचं शूटिंग सुरू होतं. टॉमचा हा बॉडीगार्ड त्याच्या सिक्युरिटी स्टाफचा प्रमुखही आहे. बुधवारी पार्किंग लॉटमध्ये ही कार नाही, हे बॉडीगार्डच्या लक्षात आलं. त्याने लगेचच पोलिसांना याबद्दलची माहिती दिली.

हे वाचा-KBC मध्ये दिसणार दीपिका, मस्तानीच्या या लूकची चर्चा; PHOTO VIRAL

वेस्ट मिडलँड्स पोलिस हेडक्वार्टर्स या घटनास्थळापासून अवघ्या दोनच मिनिटांच्या अंतरावर आहे. तक्रार दाखल होताच पोलिसांनी तातडीने कारचा शोध घेतला. त्यानंतर त्यांना काही वेळाने Smethwick मध्ये ती कार सापडली; मात्र त्यात असलेलं टॉम क्रूझचं तब्बल एक लाख पौंड म्हणजेच सुमारे एक कोटी रुपयांहून अधिक किमतीचं सामान मात्र चोरीला गेलं असल्याचं आढळलं. पोलिस आता सीसीटीव्ही फूटेजच्या आधाराने चोरांचा शोध घेत आहेत.

ज्या BMW X7 या कारमधून ही चोरी झाली, ती कार 4.7 सेकंदांत ताशी 60 मैल एवढा वेग प्राप्त करू शकते. या कारला की-लेस एंट्रीची (Key Less Entry) सुविधा आहे. त्या कारला इलेक्ट्रॉनिक ट्रॅकिंग डिव्हाइसही (Electronic Tracking Device) आहे. त्यामुळेच ती कार लगेच सापडली; मात्र कारला एवढ्या सुविधा असताना, पोलिस हेडक्वार्टर जवळ असताना, टॉम क्रूझची प्रचंड सुरक्षाव्यवस्था असतानाही एका आलिशान हॉटेलसमोरून कार चोरीला गेलीच कशी, हा मोठा प्रश्न आहे. चोरीची घटना कळल्यावर साहजिकच अभिनेता टॉम चिडला आहे. त्याने बॉडीगार्ड्सनाही सुनावलं आहे.

हे वाचा-NCB च्या रेडदरम्यान फिल्मी स्टाइल फरार अभिनेता अखेर अटकेत

की-लेस एंट्रीची सुविधा असलेल्या या कारच्या इग्निशन फोब सिग्नलचं क्लोनिंग करण्यासाठी स्कॅनरचा उपयोग केला गेला असावा, असा अंदाज आहे. गेल्या काही दिवसांत अशा कार्स चोरांच्या निशाण्यावर आहेत. हाय-टेक डिव्हाइसेसचा वापर करून अशा चोऱ्या केल्या जात आहेत.

First published:

Tags: Tom cruise