Home /News /entertainment /

राम गोपाल वर्मांचा मुंबईला कायमचा राम राम, 'या' कारणामुळे सोडलं शहर

राम गोपाल वर्मांचा मुंबईला कायमचा राम राम, 'या' कारणामुळे सोडलं शहर

बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट देणारे दिग्दर्शक आणि सिनेमांपेक्षा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारे राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) यांनी मुंबई शहर कायमचे सोडले आहे.

    मुंबई, 05 जानेवारी: बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट देणारे दिग्दर्शक आणि सिनेमांपेक्षा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारे राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) यांनी मुंबई शहर कायमचे सोडले आहे. त्यांनी आता कायमचे गोव्यात (GOA) स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला असून त्यांनी खूप विचारपूर्वक हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. राम यांनी मुंबई सोडून गोव्यात कायमचं राहण्याचा निर्णय घेतला आहे. पण कामानिमित्त ते मुंबईत ये-जा करत राहतील. ईटाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबद्दल सांगितले. गोव्यात शिफ्ट होण्याचे कारण सांगताना त्यांनी असे म्हटले आहे की, 'मी सध्या अनेक प्रोजेक्टवर काम करतोय. त्यासाठी गोवा एक योग्य ठिकाण आहे. लॉकडाऊनच्या काळात मी दीर्घकाळ हैदराबादमध्ये मुक्कामाला होतो. पण गेल्या काही महिन्यांपासून मी मुंबईबाहेर गोव्यात शिफ्ट झालोय. कोरोना व्हायरस (Covid 19) आणि लॉकडाऊनमध्ये (Lockdown) अनेक गोष्टी बदलल्या. आता संपर्काच्या नव्या साधनांशी सर्वांनी जुळवून घेतले आहे. पर्सनल मीटिंग्स आता बाद झाल्यात. आजकाल ऑनलाईन मिटींग्स आणि चॅटवर बोलतो. त्यामुळे कुठेही राहिले तरी फार बिघडणारे नाही. माझं ऑफिस 'फॅक्टरी' हेही आता मुंबईत नाही. त्यामुळे आता मी गोव्यात शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला आहे.' (हे वाचा-आता शशी थरुर यांच्यावर बरसली कंगना; म्हणाली, 'गृहिणींना पगाराची गरज नाही..') दरम्यान, राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) यांनी सन 1989 मध्ये नागार्जुन याची भूमिका असणाऱ्या 'शिवा' या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले होते. आपल्या अनेक वर्षांच्या करिअरमध्ये रंगीला, सत्या, कंपनी, सरकार यासारखे सुपरहिट चित्रपट त्यांनी दिले आहेत. (हे वाचा-मलायकाच्या Cooking Skills वर फिदा झाला अर्जुन, सोशल मीडियावर व्यक्त केला आनंद) लवकरच राम गोपाल वर्मा यांचा  '12 ओ क्लॉक' प्रदर्शित होणार आहे. यामध्ये मिथुन चक्रवर्ती (Mithun chakraborty) या सिनेमात मानसोपचार तज्ज्ञाची भूमिका साकारत आहेत. मिथुन यांच्या व्यतिरिक्त फ्लोरा सॅनी आणि मानव कौल यांचीही चित्रपटात महत्वाची भूमिका असणार आहे. त्याचबरोबर लवकरच राम गोपाल वर्मा त्यांचे काही नवीन वेब शो घेऊन येणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना त्यांच्या चित्रपटांची मेजवानी मिळणार आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Ram gopal varma, Ram Gopal Verma'

    पुढील बातम्या