जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / आता शशी थरुर यांच्यावर बरसली कंगना; म्हणाली, 'गृहिणींना पगाराची गरज नाही त्यांना...'

आता शशी थरुर यांच्यावर बरसली कंगना; म्हणाली, 'गृहिणींना पगाराची गरज नाही त्यांना...'

आता शशी थरुर यांच्यावर बरसली कंगना; म्हणाली, 'गृहिणींना पगाराची गरज नाही त्यांना...'

बॉलिवूडमधील बऱ्याच सेलिब्रिटींशी पंगा घेतल्यानंतर कंगना रणौतने (Kangna Ranaut) आता शशी थरुर (Shashi Tharoor) यांना लक्ष्य केलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 05 जानेवारी: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangna Ranaut) कधी कोणता वाद सुरू करेल हे सांगता येत नाही. बॉलिवूडमधील बऱ्याच सेलिब्रिटींशी पंगा घेतल्यानंतर तिने आता शशी थरुर (Shashi Tharoor) यांना लक्ष्य केलं आहे. त्याचं झालं असं की, अभिनेते कमल हसन (Kamal Hassan) यांनी एक ट्वीट केलं होतं. त्यात त्यांनी लिहीलं होतं की, ‘घरकाम करणाऱ्या महिलांनादेखील नोकरीचा दर्जा द्यायला हवा. तसंच घरातील गृहिणींनांदेखील मासिक भत्ता द्यायला हवा. त्या घराची आणि घरातील माणसांची काळजी घेत असतात. ’ शशी थरुर यांनी काय ट्वीट केलं? कमल हसन यांनी केलेलं ट्वीट शशी थरूर यांनादेखील पटलं. त्यांनी कमल हसन यांच्या ट्वीटला उत्तर दिलं की, ‘कमल हसन, तुमच्या विचाराचं मी स्वागत करतो. प्रत्येक राज्यातील सरकारने घर सांभाळणाऱ्या महिलांना त्यांच्या कामाचा भत्ता द्यायलाच हवी. यामुळे महिला शक्तिशाली आणि स्वायत्त होतील.’ शशी थरुर यांच्या ट्वीटवर कंगनाने ट्वीट करत टीका केली.

जाहिरात

कंगनाने काय टीका केली? कंगना रणौत म्हणाली, ‘प्रेमाला पैशात मोजू नका. आमच्या जवळच्या व्यक्तींची काळजी घेण्यासाठी आम्हाला पगाराची गरज नाही. आमच्या छोट्याच्या राज्याच्या आम्ही राणी असतो. त्यासाठी आम्हाला पैशाची गरज नाही. प्रत्येक गोष्टीला व्यवसायाच्या दृष्टीकोनातून बघू नका. महिलांना फक्त प्रेम आणि आदराची गरज आहे. त्यांचं प्रेम पैशात मोजू नका.’ अशा आशयाचं ट्वीट कंगनाने केलं.

कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर कंगना रणौतने काही दिवसांपूर्वीच थलायवी सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. तिच्या हातात आता तेजस आणि धाकड असे 2 चित्रपट आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात