मुंबई, 25 मे- बॉलिवूड (Bollywood) मध्ये सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांचा दिग्दर्शक (Director) म्हणून करण जोहरला (Karan Johar) ओळखलं जातं. करणने अनेक आयकॉनिक चित्रपटांची निर्मिती केली आहे. आज करण जोहर आपला 49 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने करणचा एक अजब किस्सा जाणून घेणार आहोत. ‘कभी ख़ुशी कभी गम’ (Kabhi Khushi Kabhi Gam) या चित्रपटाच्या शुटींग दरम्यान करण अचानक बेशुद्ध झाला होता. पाहुया काय होतं नेमकं कारण. Most memorable song of my career! My first working opportunity with the LEGEND @SrBachchan (literally fainted with nervousness) and the coming together of such incredible talent! @iamsrk @iHrithik @KajolAtUN #Jayabachchan #bebo choreographed by the one and only @TheFarahKhan https://t.co/upVuYtPw0A
सन 2001 मध्ये ‘कभी ख़ुशी कभी गम’ या चित्रपट आला होता आणि तो खूप चाललादेखील होता. यामध्ये अमिताभ बच्चन, जया बच्चन,शाहरुख खान,काजोल, करीना कपूर, हृतिक रोशन, फरीदा जलाल, सारखी तगडी स्टारकास्ट होती. या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान एक किस्सा घडला होता. (हे वाचा: करण जोहर वाढदिवशी करणार जंगी पार्टी; 3 दिवस अलिबागमध्ये घालणार धुमाकूळ ) ‘बोले चुडिया’ हे गाणं आजही तितकचं प्रसिद्ध आहे. हे गाणं याच चित्रपटातील आहे. या गाण्याचं चित्रीकरण चालू होतं आणि याच दरम्यान करण जोहरला चक्कर आली होती. तो सेटवर बेशुद्ध झाला होता. त्यांनतर त्याला एका खोलीत झोपवण्यात आलं होतं. डीहायड्रेशनमुळे त्याला ही चक्कर आली होती. तसेच तो अमिताभ बच्चन आणि इतर बड्या स्टारकास्टसोबत काम करताना फार नर्व्हस झाला होता. ही गोष्ट त्याने एकदा सोशल मीडियावरसुद्धा सांगितली होती. (हे वाचा: ‘हृतिकमुळं मी मरणारच होतो’; अभयनं सांगितला जीवघेण्या अपघाताचा थरारक अनुभव ) तसेच करण जोहरने त्या खोलीतून वॉकी टोकिच्या सहाय्याने हे चित्रीकरण पूर्ण केलं होतं आणि हे गाणं सुपरहिट ठरलं होतं. आजही या गाण्यावर तितक्याच उत्साहाने डान्स केला जातो. करणने आपल्या कारकिर्दीत कुछ कुछ होता है, कभी अलविदा ना केहना, माय नेम इज खान सारखे अनेक दर्जेदार चित्रपट केले आहेत.