मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

‘त्या दिवशी हृतिकमुळं मी मरणारच होतो’; अभय देओलनं सांगितला जीवघेण्या अपघाताचा थरारक अनुभव

‘त्या दिवशी हृतिकमुळं मी मरणारच होतो’; अभय देओलनं सांगितला जीवघेण्या अपघाताचा थरारक अनुभव

हृतिकमुळं अभय आणि फरहान अख्तर मरणार होते; ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’च्या सेटवर झाला होता जीवघेणा अपघात

हृतिकमुळं अभय आणि फरहान अख्तर मरणार होते; ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’च्या सेटवर झाला होता जीवघेणा अपघात

हृतिकमुळं अभय आणि फरहान अख्तर मरणार होते; ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’च्या सेटवर झाला होता जीवघेणा अपघात

  • Published by:  Mandar Gurav
मुंबई 24 मे: ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ (Zindagi Na Milegi Dobara) हा बॉलिवूडमधील आजवरच्या सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. जबरदस्त संवाद, कविता आणि हृतिक रोशन, फरहान अख्तर, अभय देओल यांचं अफलातून त्रिकूट यामुळं हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. कितीही समस्या असल्या तरी आयुष्य आनंदात जगता येतं हे या चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र या चित्रपटाचं चित्रीकरण करणं काही सोप काम नव्हतं. एका सीन शूट करताना तर अभय आणि फरहान अक्षरश: मरता मरता वाचले होते. पाहूया काय होता तो प्रसंग... ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ चित्रपटाची निर्माती जोया अख्तरने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत चित्रपटातील काही ऑफस्क्रीन दृश्य दाखवण्यात आली आहेत. यापैकी एका सीनमध्ये हृतिक, फरहान आणि अभय बार्सिलोना ते कोस्टा ब्रावा प्रवास करत असतात. हृतिक गाडी चालवत असतो. दरम्यान हृतिकला ऑफिसमधून एक फोन येतो. फोनवर बोलण्यासाठी तो गाडी घाटात रस्त्याच्या बाजूला लावतो आणि गाडीतून खाली उतरतो. पण हृतिक गाडीतून उतरताना गाडी बंद करायला विसरतो. हृतिक खाली उतरताच गाडी पुढे सरकते. फरहान गाडीतून उडी मारतो आणि गाडीत बसलेला अभय घाबरतो. पण हृतिक पटकन येऊन गाडी बंद करतो. ‘तुझ्यामुळं मुस्लीम स्त्रियांचं नाव खराब होतं’; अंजुम फकीह बिकिनी फोटोंमुळं होतेय ट्रोल
View this post on Instagram

A post shared by Tiger Baby (@tigerbabyfilms)

या प्रसंगाबद्दल अभयन व्हिडीओमध्ये आपला अनुभव सांगितला आहे. तो म्हणाला त्यामी आम्ही मरता मरता वाचलो. हृतिकमुळे मी आणि फरहान मरणारच होतो. फरहान खूप फास्ट आहे. त्यामुळं लगेच त्यानं उडी मारली. पण मी गाडीत अडकलो. त्याचा हा अनुभव ऐकून त्याच्यासोबत असलेले इतर कलाकार हसून त्याची भीती दूर करताना दिसत आहेत.
First published:

Tags: Bollywood actor, Entertainment, Shocking news

पुढील बातम्या