• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • करण जोहर वाढदिवशी करणार जंगी पार्टी; 3 दिवस अलिबागमध्ये घालणार धुमाकूळ

करण जोहर वाढदिवशी करणार जंगी पार्टी; 3 दिवस अलिबागमध्ये घालणार धुमाकूळ

कोरोना काळात पार्टी करण्याची संमती मिळाली कशी? करण जोहरच्या पार्टीवर अनेकांनी केला सवाल

 • Share this:
  मुंबई 24 मार्च: करण जोहर (Karan Johar) हा बॉलिवूडमधील एक नामांकित दिग्दर्शक, निर्माता म्हणून ओळखला जातो. ‘कुछ कुछ होता है’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘कल हो ना हो’, ‘अग्निपथ’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांच्या माध्यमातून त्यानं जवळपास दोन दशकं गाजवली आहेत. अशा या सुपरस्टार करणचा 25 मे रोजी वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्तानं अलिबागला एका खास पार्टीचं आयोजन करणार आहे. अन् या पार्टीत देशभरातील अनेक नामांकित सेलिब्रिटी सामिल होणार आहेत. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या पार्टीस प्रशासनानं संमती कशी दिली असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. 25 मे रोजी करण जोहर आपल्या 49वा वाढदिवस साजरा करणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाचाही वाढदिवस अगदी धुमधडाक्यात साजरा करावा अशी त्याची इच्छा आहे. पिंकविलानं दिलेल्या वृत्तनुसार अलिबागला यासाठी त्यानं एका जंगी पार्टीचं आयोजन देखील केलं आहे. दीपिका पादुकोण, विराट कोहली, रणवीर सिंह, रणबीर कपूर, आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा आडवाणी, शाहरुख खान, गौरी खान, विक्की कौशल, कतरीना कैफ, अनन्या पांडे, इशान खट्टर, सीमा खान, संजय कपूर, आदित्य रॉय कपूर आणि अनुष्का शर्मा हे सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. कोरोनामुळं 24,25 आणि 26 असे तीन दिवस ही पार्टी केली जाणार आहे. पोलीस हो तुमच्यासाठी! कोरोना योद्धांसाठी सरसावले मराठी सेलिब्रिटी संपूर्ण राज्य सध्या कोरोनामुळं होरपळून गेलं आहे. गर्दी होऊ नये म्हणून सरकारनं लॉकडाउन जारी केला आहे. शिवाय सर्वसामान्य लोकांना कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडण्यास मनाई आहे. मग सेलिब्रिटींना पार्ट्या करण्याची संमती कशी आणि कोणी दिली? असा प्रश्न चाहत्यांद्वारे केला जात आहे. अर्थात याबाबत करण जोहरनं कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
  Published by:Mandar Gurav
  First published: