मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Video : ‘माझा होशील ना फेम’ गौतमीने वीर सावरकरांना अशी वाहिली आदरांजली

Video : ‘माझा होशील ना फेम’ गौतमीने वीर सावरकरांना अशी वाहिली आदरांजली

गौतमी देशपांडेने वीर सावरकरांना वाहिली आगळीवेगळी आदरांजली.

गौतमी देशपांडेने वीर सावरकरांना वाहिली आगळीवेगळी आदरांजली.

गौतमी देशपांडेने वीर सावरकरांना वाहिली आगळीवेगळी आदरांजली.

मुंबई 28 मे : स्वातंत्र्यवीर सावरकरांची (Swatantryaveer Sawarkar) आज जयंती, निमित्ताने अनेकांनी त्यांना विनम्र अभिवादन केलं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही (Narendra Modi) सावरकरांना अभिवादन केलं. अनेक सिने कलारांनीही निरनिराळ्या पद्धतीने अभिवादन केलं. अभिनेत्री गौतमी देशपांडेने (Gautami Deshpande) तिच्या खास शैलीत सावरकरांना आदरांजली दिली आहे.

गौतमी ही अभिनयासोबतच एक उत्तम गायिका आहे हे आता सर्वच जाणतात. सोशल मीडियावर तिच्या गोड आवाजात ती नेहमीच गाण्यांचे व्हिडीओ पोस्ट करताना दिसते. आताही तिने तिच्या गोड आवाजात सावरकरांनी लिहिलेलं ‘सागरा प्राण तळमळला’ (Sagra Pran Talmalala) हे गीत गायलं आहे.

सावरकरांचा जीवनप्रवास मोठ्या पडद्यावर; महेश मांजरेकर करणार बायोपिकचं दिग्दर्शन

गौतमीच्या गोड गळ्यातून गायलेलं हे गीत तिच्या चाहत्यांना चागंलच पसंत पडलं आहे. अनेकांना हे गीत ऐकून सावरकरांच्या ‘काळे पाणी’ (Kale Pani) या पुस्तकाचीही आठवण झाली. तर काहींना शाळेची आठवण झाली.  काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना विनायक दामोदर सावरकर (Vinayak Damodar Sawarkar) अर्थात स्वातंत्र्यवीर सावरकांनी लिहीलेलं हे गीत आजही श्रोत्यांच्या कानांना मंत्रमुग्ध करत.

याआधी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) आणि सगळ्या मंगेशकर भांवडांनी हे गाण संगीतबद्ध केलं होतं. जे अतिशय लोकप्रिय ठरलं होत. तर आता गौतमीने पुन्हा एकदा आठवणी ताज्या केल्या आहेत.

गौतमी सध्या झी मराठी (Zee Marathi) वरील ‘माझा होशील ना’ (Maza Hoshil Na) या मालिकेत दिसत आहे. त्याती सई हे पात्र साकारत आहे. अभिनेता विराजस कुलकर्णी सोबत तिची केमिस्ट्री हीट ठरत आहे. मालिकेत सध्या सई आणि आदीत्य घराबाहेर पडत आहेत. ब्रम्हेंच्या घरी झालेल्या विवादानंतर त्यांनी हा निर्णय घेतला होता.

First published:
top videos

    Tags: Marathi entertainment, Zee marathi serial