Home /News /entertainment /

धर्मेंद्र यांनी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’च्या टीमसोबत शेअर केला PHOTO; युजर्स म्हणाले 'रणवीर पेक्षा यंग'

धर्मेंद्र यांनी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’च्या टीमसोबत शेअर केला PHOTO; युजर्स म्हणाले 'रणवीर पेक्षा यंग'

धर्मेंद्र यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर चित्रपट निर्माता करण जोहर आणि अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh), आलिया भट्ट (Alia Bhatt), शबाना आझमी यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो करणच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाच्या दिल्लीतील शूटिंगदरम्यान घेण्यात आला आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 30 नोव्हेंबर-   धर्मेंद्र   (Dharmendra)  हे एक असे दिग्गज अभिनेते आहेत जे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्यांची फॅन फॉलोइंगही अनेक नवीन कलाकारांना मागे टाकताना दिसते. अलीकडेच धर्मेंद्र हे त्याचा मुलगा सनी देओलसोबत लांबच्या प्रवासावर दिसले होते. यादरम्यान पिता-पुत्राने खूप मस्ती करताना फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते. आता धरम पाजी यांनी करण जोहरच्या आगामी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'   (Rocky Aur Rani Ki Prem Kahani)  या चित्रपटाच्या संपूर्ण टीमसोबत अतिशय सुंदर स्टाईलमध्ये पोझ करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवर चाहते धर्मेंद्र यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक करताना दिसत आहेत.
  धर्मेंद्र यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर चित्रपट निर्माता करण जोहर आणि अभिनेता रणवीर सिंग   (Ranveer Singh), आलिया भट्ट   (Alia Bhatt), शबाना आझमी यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो करणच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाच्या दिल्लीतील शूटिंगदरम्यान घेण्यात आला आहे. दिल्लीतील कुतुबमिनार कॉम्प्लेक्समध्ये काढलेल्या या फोटोमध्ये धर्मेंद्र पांढरा स्वेटर आणि काळी पँट घातलेले दिसत आहेत. गळ्यात मफलर आणि टोपी घातलेले धर्मेंद्र नेहमीसारखेच देखणे दिसत आहेत. दुसरीकडे, शबाना आझमी पांढऱ्या साडीत धर्मेंद्रचा हात धरून स्मितहास्य देताना दिसत आहेत.तर आलिया भट्टने लाल आणि पांढऱ्या रंगाची फ्लोरल साडी परिधान केली आहे. रणवीर सिंग पांढऱ्या रंगाच्या जॅकेट आणि पँटमध्ये दिसत आहे. तर चित्रपट निर्माता करण जोहर रंगीबेरंगी गुची आउटफिटमध्ये दिसत आहे. हा फोटो शेअर करत धर्मेंद्र यांनी एक खूप गोंडस कॅप्शन लिहिले आहे. 'मित्रांनो, प्रेम. प्रेम आणि आदर, इतकं भेटलं सगळ्यांकडून.. वाटलंच नाही की मी नवीन युनिटसोबत काम करत आहे'. धर्मेंद्रच्या या पोस्ट आणि फोटोला चाहते प्रचंड लाइक आणि कमेंट करत आहेत. पण एका चाहत्याने धरम पा जी यांना रणवीर सिंगपेक्षा वयाने लहान असल्याचे सांगितले. तर एकाने लिहिले, 'सर तुम्ही एक लेजेंड आहात… हे त्यांचे भाग्य आहे की त्यांना तुमच्यासोबत काम करायला मिळाले. संधी मिळाली'. (हे वाचा:Antim Box Office Collection Day 4: 'अंतिम' च्या कमाईत घट; सोमवारी जमवले इतके....) 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटाचे शूटिंग दिल्लीत सुरू आहे. अलीकडे सोशल मीडियावर रणवीर सिंग आणि आलिया भट्टचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दोघेही कुतुबमिनारजवळ धावत आणि पोज देताना दिसले होते.त्याच वेळी, करण जोहर, फराह खान आणि मनीष मल्होत्रा ​​यांनी चित्रपटाच्या सेटवरील BTS व्हिडिओ-फोटो देखील शेअर केले होते.'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट 10 फेब्रुवारी 2023 रोजी रिलीज होणार आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Alia Bhatt, Dharmendra deol, Entertainment, Ranveer sigh

  पुढील बातम्या