मुंबई, 31 ऑगस्ट- आपल्या डान्स आणि अभिनयाने सर्वांना वेड लावणारी माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) वयाच्या पन्नाशीतसुद्धा तितकीच उत्साही आणि सक्रीय दिसून येते. माधुरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तसेच ती विविध कार्यक्रमातसुद्द्धा सहभागी होत असते. नुकताच माधुरीने एका मराठी कार्यक्रमामध्ये (Marathi Show) हजेरी लावली होती. यादरम्यान तिने एक गुपित सांगितलं ते ऐकून सर्वांनाचं सुखद धक्का बसला.
बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणून अभिनेत्री माधुरी दीक्षितला ओळखलं जातं. इतकी वर्ष आपल्या अदाकारीने माधुरीने सर्वांनाचं घायाळ केलं आहे. माधुरीने अनेक दमदार भूमिका साकारत आपलं विशेष स्थान निर्माण केलं आहे. माधुरीच्या स्माईलचे आजही लाखो लोक वेडे आहेत. बॉलिवूडमध्ये राज्य करणारी ही अभिनेत्री अस्सल महाराष्ट्रीयन आहे. माधुरी जरी हिंदी चित्रपटसृष्टीत काम करत असली, तरी ती एक मराठमोळी मुलगी आहे. त्यामुळे तिचं मराठीवर विशेष प्रेम आहे. नुकताच माधुरी राजश्री मराठीच्या एका मराठी कार्यक्रमामध्ये सहभागी झाली होती. यावेळी ती खुपचं आनंदी आणि उत्साही दिसून येत होती. तसेच यावेळी तिनं सांगितलं, की ती मराठी कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहे, हे ऐकून तिची आई जाम खुश झाली होती. (हे वाचा: असं होतं ‘तुझ्या माझ्या संसाराला…’ मालिकेचं शुटींग; VIDEO होतोय VIRAL ) माधुरीने हे सांगताचं सर्वांनाचं मोठं कौतुक वाटलं. तसेच आपल्या मायबोलीवर माधुरी आणि तिच्या आईचं असलेलं प्रेम पाहून सर्वांनाचं आनंददेखील झाला. इतकचं नव्हे तर यावेळी माधुरीने एक खास उखाणादेखील आहे. उखाना घेण्यासाठी माधुरीला मराठी अभिनेता पुष्कर श्रोत्रीनं विशेष मदत केली. माधुरीने पुष्करचे आभारदेखील मानले. एकंदरीत या कार्यक्रमामध्ये माधुरी खुपचं उत्साही दिसून येत होती.