• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • असं होतं ‘तुझ्या माझ्या संसाराला...’ मालिकेचं शुटींग; VIDEO होतोय VIRAL

असं होतं ‘तुझ्या माझ्या संसाराला...’ मालिकेचं शुटींग; VIDEO होतोय VIRAL

झी मराठीवर नुकताच राणा दाची म्हणजेच हार्दिक जोशीची नवी मालिका आलेली आहे. त्या मालिकेचं नाव ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ असं आहे.

 • Share this:
  मुंबई, 31 ऑगस्ट-  सध्या अनेक मराठी मालिका (Marathi Serial) आपल्या भेटीला आलेल्या आहेत. या मालिका दररोज आपलं मनोरंजन करत असतात. आपल्याला मालिका पाहताना खुपचं सहज सोपं वाटतं असतं. मात्र मालिकेतील प्रत्येक सीनसाठी प्रचंड कष्ट घ्यावे लागतात. नुकताच झी मराठीवर हार्दिक जोशी(Hardik Joshi) आणि अमृता पवार(Amruta Pawar) यांची ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’(Tujhya Majhya Sansarala Aani Kay Hava) ही मालिका सुरु झाली आहे. या मालिकेतील मुख्य कलाकरांनी आपल्यासाठी खास एक व्हिडीओ बनवला आहे. यामध्ये प्रत्येक सीन कसा शूट केला जातो. आणि त्यासाठी सेटवरील लोक कसे कष्ट घेत असतात हे सर्व दाखवलं आहे.
  झी मराठीवर नुकताच राणा दाची म्हणजेच हार्दिक जोशीची नवी मालिका आलेली आहे. त्या मालिकेचं नाव ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ असं आहे. या मालिकेत हार्दिकसोबत अभिनेत्री अमृता पवार मुख्य भूमिकेत आहे. मालिकेत अभिनेत्री एका मॉडर्न् घरातील असून तिचं अगदी लहान कुटुंब असतं. फक्त आई-वडील आणि ती अशी छोटसं कुटुंब असतं. तर याउलट दुसरीकडे अभिनेत्याचं प्रचंड मोठं असं एकत्र कुटुंब असतं. यामध्ये आजा-आजी, काका-काकी पासून ते आती नातू असे सर्व लोक असतात. आता या दोघांच्या लव्हस्टोरीमध्ये या दोघांच्या कुटुंबाची भूमिका कोणती असणार आणि लग्नानंतर अभिनेत्री इतकं मोठं कुटुंब कसं जपणार हे पाहणं महत्वाच आहे. (हे वाचा:फुलाला सुगंध मातीचा'च्या कलाकारांच्या आयुष्यात 'हे' लोक आहेत खास  ) या मोठ्या अश्या कुटुंबाचं चित्रीकरण करण्यासाठी सर्व सेटअप करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. सेटवरील लोक यासाठी कष्ट घेत असतात. नुकताच व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये अभिनेत्री अमृता पवार आपल्या सेटवर कशा पद्धतीनं सीन शूट केले जातात याबद्दल माहिती देत आहे. तर दुसरीकडे हार्दिक जोशी सेटवरील सर्वांची ओळख करून देत आहे. हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. व्हिडीओ पाहून अनेकांना मालिका पाहण्याचा मोह आवरत नाहीय.
  Published by:Aiman Desai
  First published: