बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती आणि हॉलिवूड अभिनेता निक जोनस नुकताच एका आगळ्यावेगळ्या अंदाजात दिसून आला. निकने अलीकडेच आपल्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेयर केले होते. या फोटोंमध्ये तो एकदम बिनधास्त अंदाजात दिसून येत होता. मात्र यावेळी निकने एक खूपच वेगळ्या प्रकराचा शर्ट घातला होता. त्यावरून त्याला अनेक युजर्सनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने कमेंट करत म्हटलं आहे, 'ही तर सोलापूरी चादर आहे', तर दुसऱ्या एका युजरने म्हटलं आहे 'आमच्यात याला बेडशीट म्हणतात'. कारण निकने घातलेला शर्ट हुबेहूब चादरी सारखा दिसत होता. निक हा अभिनेत्री प्रियांका चोप्राचा पती आहे. हे दोघेही सतत सोशल मीडियावर असे हटके फोटो शेयर करून चर्चेत असतात.