अभिनेता सलमान खानच्या प्रत्येक चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात असतात. त्याच्या प्रत्येक चित्रपटाला चाहत्यांकडून पसंतीची पावती मिळते. यावेळी सलमानने गणेशोत्सवानिमित्त चाहत्यांना ही खास भेट दिली आहे. सलमानने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या चित्रपटाचं पहिलं पोस्टर रिलीज केलं आहे. तसेच याला कॅप्शन देत सलमानने म्हटलं आहे, ‘बुराई के अंत की शुरुवात, गणपती बाप्पा मोरया’ चाहते पोस्टर पाहून खूपच उत्सुक झाले आहेत. (हे वाचा:मलायका अरोराच्या Pimple free चेहऱ्याचा 'राज'; अभिनेत्रीने सांगितलं Beauty secret ) ‘अंतिम: द फायनल ट्रुथ’ हा चित्रपट एक पोलीस अधिकारी आणि विविध प्रकारच्या गुंडाभोवती फिरणारा आहे. यावरून सलमान खान चित्रपटात वाईटाचा अंत करताना दिसून येणार हे लक्षात येत आहे. सलमान खान या चित्रपटाचा निर्मातासुद्धा आहे. तसेच मराठमोळे दिग्दर्शक महेश मांजरेकर या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. चित्रपटात सलमान खानसोबत त्याचा भावोजी अर्थातच बहीण अर्पिताचा नवरा आणि ‘लवयात्री’ फेम अभिनेता आयुष शर्मासुद्धा असणार आहे. तसेच चित्रपटात छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री महिमा मखवानासुद्धा असणारा आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Salman khan