जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / अरे बापरे! मैत्रिणीसोबत डान्स करताना रितेशचा घसरला पाय; मग बायको जेनेलियानं काय केलं पाहा VIDEO

अरे बापरे! मैत्रिणीसोबत डान्स करताना रितेशचा घसरला पाय; मग बायको जेनेलियानं काय केलं पाहा VIDEO

अरे बापरे! मैत्रिणीसोबत डान्स करताना रितेशचा घसरला पाय; मग बायको जेनेलियानं काय केलं पाहा VIDEO

बायको जेनेलियासमोरच (Genelia d’souza) मैत्रिणीच्या गळ्यात गळे घालून रितेश (Riteish deshmukh) मस्त डान्स करत होता आणि पुढे काय झालं ते तुम्हीच पाहा.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 01 मार्च : अभिनेता रितेश देशमुख (Riteish deshmukh) आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूजा (Genelia D’Souza) बॉलिवूडमधील फेव्हरेट कपल आहे. दोघंही सोशल मीडियावर सातत्याने अॅक्टिव्ह असतात. सध्या त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो. ज्यामध्ये रितेश जेनेलियासमोरच मैत्रिणीसोबत मस्ती करताना दिसतो आहे. डान्स करता करता रितेशचा त्याचा पाय घसरतो आणि मैत्रिणीसोबत तो पाण्यात पडतो. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. रितेशनं आपल्या इन्स्टाग्रामव अकाऊंटवर हा मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याच्यासोबत जेनेलिया आणि त्याचे इतर तीन मित्रमैत्रिणी आहेत. सर्वजण स्विमिंग पूलवर एकत्र डान्स करताना दिसत आहेत. पुढे नेमकं काय होतं ते तुम्हीच पाहा.

जाहिरात

व्हिडीओत पाहू शकता, रितेश, जेनेलिया आणि त्यांचे मित्रमैत्रिणी स्विमिंग पूलच्या किनाऱ्यावर डान्स करत आहेत. नाचता नाचता आधी रितेशच्यैा मैत्रिणीचा पाय घसरतो आणि तिला वाचवण्यासाठी जाणाऱ्या रितेशही घसरून पडतो. दोघंही पाण्यात पडतात. त्यावेळी जेनेलियालाही हसू आवरत नाही. हे वाचा -  आलिया झाली बिझनेस वुमन! अभिनयच नव्हे तर प्रॉडक्शन हाउससुद्धा चालवतात या नट्या पाण्यात पडल्यानंतरही रितेशची मस्ती काही थांबत नाही. पाण्याबाहेर येऊन तो आणखी मजा करताना दिसतो. रितेश आणि जेनेलियाच्या चाहत्यांना हा व्हिडीओ खूप आवडला आहे. त्यावर बऱ्याच प्रतिक्रियादेखील येत आहेत.

याआधी जेनेलियाचा पार्टीतला असा डान्स करताना व्हिडीओ व्हायरल झाला होता. ‘सैराट’च्या ‘झिंगाट’ गाण्यावर जेनेलिया, रितेश यांनी आपल्या दोस्तांसोबत ताल धरला. जेनेलिया आपल्या मैत्रिणींसोबत डान्स करताना रितेश देशमुख आणि त्याच्या मित्राची एंट्री होते. हे सगळे मिळून इतका तुफान डान्स करता, की शेवटी जेनिलिया आणि मैत्रिणी अक्षरशः जमिनीवर पडतात. हे वाचा -  VIDEO : रिया चक्रवर्तीची पुरुषप्रधान मानसिकतेला पुन्हा चपराक रितेश आणि जेनेलिया हे हिंदी चित्रपटसृष्टीतलं एक क्युट कपल. ‘तुझे मेरी कसम’मधून दोघांनी केलेली एंट्री सुपरहिट ठरली. सिनेमानंतरच दोघांनी एकमेकांसोबत आयुष्यभर एकत्र राहायचं ठरवलं. रितेश आणि जेनेलियाच्या लग्नाला आता 8 वर्षे पूर्ण झाली आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात