Home /News /entertainment /

Archana Joglekar B'day: कधी आपल्या सौंदर्याने घायाळ करणारी अभिनेत्री अर्चना जोगळेकर आज परदेशात राहून करते हे काम...

Archana Joglekar B'day: कधी आपल्या सौंदर्याने घायाळ करणारी अभिनेत्री अर्चना जोगळेकर आज परदेशात राहून करते हे काम...

Happy Birthday Archana Joglekar: 90च्या दशकातील एक अतिशय सुंदर अभिनेत्री म्हणून अर्चना जोगळेकर यांची ओळख हिंदी आणि मराठी प्रेक्षकांना होती. अर्चना यांनी उडिया भाषेतील चित्रपटांतही काम केलं होतं. 56 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या या कलाकाराविषयी या गोष्टी माहीत आहेत का?

पुढे वाचा ...
  मुंबई,1मार्च : 90च्या दशकातील एक अतिशय सुंदर अभिनेत्री (90s actress)म्हणून अर्चना जोगळेकर(archana joglekar birthday) यांची ओळख होती. अभिनेत्री त्याचबरोबर एक नृत्यांगना (dancer) असलेल्या अर्चना यांनी मराठी, हिंदी तसेच उडिया भाषेतील चित्रपटांत अभिनय करून चित्रपटसृष्टीत (film industry)आपली एक खास ओळख निर्माण केली आहे. अशा या सुंदर अभिनेत्रीचा आज वाढदिवस (birthday)आहे. अर्चना 1 मार्चला आपला 56वा वाढदिवस साजरा करत आहेत. 1965 मध्ये एका मराठी कुटुंबात अर्चना यांचा जन्म झाला.त्या अभिनेत्री सोबतच एक कथक नृत्यांगना आणि कोरिओग्राफरसुद्धा आहेत. त्यांनी आपली आई आशा जोगळेकर यांच्याकडून कथकचे धडे घेतले आहेत. आशा जोगळेकर यांनी 1963 मध्ये ‘अर्चना नृत्यालय’ या नावाने एक नृत्य शाळा सुद्धा सुरू केली होती. त्यानंतर अर्चना यांनी स्वतः 1999 मध्ये ‘न्यू-जर्सी’ (new-jersey) याठिकाणी या नृत्य शाळेची एक शाखा सुरू केली आहे. मराठी चित्रपटांतून जास्त प्रसिद्धी मिळविलेल्या अर्चना जोगळेकर यांना 90च्या (90's era) दशकातील अत्यंत सुंदर अभिनेत्रीनंपैकी एक समजल जात होत. त्यांनी ‘एका पेक्षा एक’, ‘निवडुंग’, ‘अनपेक्षित’ या मराठी तर संस्कार या हिंदी चित्रपटांतून आपल्या अभिनयाची आणि सुंदरतेची छाप चाहत्यांच्या मनावर सोडली आहे. त्यानंतर मात्र अर्चना लग्न करून परदेशात स्थायिक झाल्या. अर्चना जोगळेकर आणि अभिनेता सचिन पिळगांवकर यांच्या 'एकापेक्षा एक' या  चित्रपटातील 'ये जिवलगा' हे गाणं आजही प्रत्येकांच्या ओठांवर असतं. तू तेव्हा तशी या गाण्यामुळेही अर्चना यांची ओळख मराठी  चित्रपटप्रेमींना आहे. त्यांच्याबातीत एक धक्कादायक माहिती सुद्धा समोर आली होती. 3 नोव्हेंबर 1997 मध्ये त्या ओडीसा येथे आपल्या चित्रपटाच चित्रीकरण करत असताना, एका नराधमाने त्यांच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता. (हे पाहा :मालदीव अन् बोल्ड फोटोशूट; बिपाशा समुद्र किनारी घेतेय सुट्ट्यांचा आनंद  ) असं सांगण्यात येतं की, 1997 मध्ये त्या नराधमाला पोलिसांनी अटक केली होती. आणि 2010 मध्ये भुवनेश्वर फास्टट्रक कोर्टने त्याला 18 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. चित्रपटांबरोबरच अर्चना यांनी टीव्ही मालिकांमध्येही काम केलं आहे. 'चुनौती' (1987), 'कर्मभूमि', 'फूलवंती' (1992), 'किस्सा शांति का', 'चाहत और नफरत' (1999) अशा हिंदी मालिकांत त्यांनी आपलं अभिनय कौशल्य दाखवलं आहे.

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Bollywood, Bollywood actress

  पुढील बातम्या