मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /HBD: जॉनी यांच्या नावापुढे लीवर कसं लागलं; जाणून घ्या तो किस्सा

HBD: जॉनी यांच्या नावापुढे लीवर कसं लागलं; जाणून घ्या तो किस्सा

हा कॉमेडीचा बादशाह आज आपला 64वा वाढदिवस साजरा (64 Birthday Today) करत आहे.

हा कॉमेडीचा बादशाह आज आपला 64वा वाढदिवस साजरा (64 Birthday Today) करत आहे.

हा कॉमेडीचा बादशाह आज आपला 64वा वाढदिवस साजरा (64 Birthday Today) करत आहे.

मुंबई, 14 ऑगस्ट- बॉलिवूडचा (Bollywood) कॉमेडीकिंग म्हणून अभिनेता जॉनी लीवर(Jhony Lever) यांना ओळखलं जात. आपल्या अनोख्या स्टाईल आणि विनोदाने त्यांनी नेहमीच सर्वांची मने जिंकली आहेत. हा कॉमेडीचा बादशाह आज आपला 64वा वाढदिवस साजरा (64 Birthday Today) करत आहे. त्यांनी जलवा, तेजाब, बाजीगर, बादशाह सारख्या 350 पेक्षा जास्त चित्रपटांत काम केलं आहे आहे. आजसुद्धा चित्रपटांत त्यांची कॉमेडीपाहून सर्वचजण हसून हसून लोटपोट होतात. त्यांनी हे यश मिळविण्यासाठी खूप मेहनत केली आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी.

जॉनी लीवर यांचा जन्म 14 ऑगस्ट 1947 मध्ये आंध्रप्रदेशमधील एका तेलुगु ख्रिश्चन कुटुंबात झाला होता. त्यांचं खरं नाव जॉनीराव प्रकाशराव जनुमाला असं आहे. ते धारावीमध्ये राहात होते. त्यांचे वडील हिंदुस्तान युनिलीवर लिमिटेडमध्ये एक ऑपरेटर म्हणून काम करत होते. त्यांच्या पगारावर खूपच बिकट परीस्थित घर चालायचं. मीडिया रिपोर्टनुसार घरच्या बिकट परिस्थितीमुळे इयत्ता सातवीत असताना त्यांना आपलं शिक्षण सोडावं लागलं होतं. तसेच त्यांनी घरी आर्थिक सहाय्य करण्यासाठी खूप वेगवेगळ्या पद्धतीची कामे केली आहेत. जॉनी लिवर यांनी रस्त्यावर पेन विकण्यापासून ते रस्त्यावर डान्स करने तसेच बॉलिवूड कलाकरांच्या नकला उतरवण्यापर्यंत सगळ काही केलं आहे.

(हे वाचा:TMKOC : विनोदी कलाकारांचं किती असेल मानधन? जेठालालची कमाई पाहून भोवळच येईल )

आयुष्यातील या कठीण प्रसंगानी आज त्यांना इतकं चांगला माणूस बनवला आहे. काही काळानंतर त्यांचे वडील त्यांना आपल्यासोबत आपल्या ऑफिसमध्ये घेऊन जाऊ लागले. आणि ऑफिसमधील कर्मचाऱ्यांमध्ये ते खूपच फेमस झाले. आणि त्याचं कारण होतं त्यांची अफलातून मिमिक्री. ऑफिसच्या वार्षिक समारंभामध्येसुद्धा त्यांना मिमिक्री करण्यासाठी बोलवण्यात येऊ लागलं. त्यांच्या विनोदी मिमिक्रीने संपूर्ण स्टाफ आणि पाहुणे मंडळी हसून हसून लोटपोट झाली आणि इथून’चं त्यांच्या नावापुढे लिवर असं लागलं. आणि त्यांनी हे नाव आयुष्यभर जपलं. जॉनी लिवर यांनी 1981मध्ये आपली नोकरी सोडून दिली. आणि नंतर कॉमेडी करण्यास सुरुवात केली होती.बॉलिवूडमध्ये त्यांना पहिला ब्रेक ‘हम तुम पे कुर्बान’ चित्रपटातून मिळाला होता.

First published:

Tags: Bollywood News, Entertainment