नवी दिल्ली, 13 ऑगस्ट : दिलीप जोशी (Dilip Joshi) उर्फ जेठालाल (Jethalal) तसं पाहता टिव्ही शो आणि चित्रपटांमध्ये दिसले आहेत. मात्र त्यांना खरी लोकप्रियता ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेतून मिळाली आहे. गेल्या 10 वर्षांपासून अधिक काळापासून ही मालिका सुरू आहे. आणि विशेश म्हणजे ही मालिका आजही लोकांच्या पसंतीस उतरत आहे. मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतो. मालिकेतील सर्वात लोकप्रिय भूमिका आहे जेठालाल. दिलीप जोशींनी आपल्या अभिनयाने जेठालाल घराघरांमध्ये पोहोचवला.
त्यांना या मालिकेतून खूप प्रसिद्धी मिळाली. आणि खरं पाहता प्रेक्षकांचं प्रेम त्यांनी आपल्या कामातून मिळवलं. तुम्हाला माहीत आहे का की दिलीप जोशी यांनी (Dilip Joshi Net Worth) या मालिकेच्या माध्यमातून किती कमाई केली आहे? कोईमोईने नेटवर्थदेखो.कॉमच्या हवाल्याने सांगितलं की, दिलीप यांनी या मालिकेसाठी आतापर्यंत 5 मिलियन डॉलर कमावले आहेत. जे तब्बल 37 कोटी रुपयांपर्यंत आहे. तरी याबाबत अधिकृत माहिती आलेली नाही.
हे ही वाचा-सेल्फी घेता-घेता केलं KISS; पाहा जास्मिन भसीनसोबत काय घडलं
तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही एक अशी मालिका आहे, ज्यात अनेक कलाकारांचं करिअर घडवलं. जेठालाल या भूमिकेत जोशी बरेच लोकप्रिय आहेत. ते आपल्या कॉमिक टाइमिंगसाठी ओळखले जातात. त्यांनी ‘क्या बात है, ‘दो और दो पांच’, ‘दाल में काला’, ‘कोरा कागज’, ‘हम सब बाराती’, ‘सी.आई.डी’ सारख्या मालिकांमध्येही काम केलं आहे. त्याशिवाय दिलीप यांनी अनेक चित्रपटातही काम केलं आहे. त्यांनी ‘मैंने प्यार किया’, ‘हम आपके हैं कौन’, ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’, ‘खिलाड़ी 420’, ‘ढूंढते रह जाओगे’ आणि ‘व्हाट्स योर राशि’ सारख्या चित्रपटांंमध्ये काम केलं. काही दिवसांपूर्वी ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ च्या सेटवरुन दिलीप जोशी आणि त्यांचे को-अॅक्टर शैलेश लोढ़ा यांच्यामध्ये वादाच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र जोशींनी या बातम्या खोडून काढल्या होत्या,
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.