Home /News /entertainment /

करिना कपूरच्या Christmas पार्टीमध्ये आलिया-रणबीरची हटके एन्ट्री, पाहा Inside Photos

करिना कपूरच्या Christmas पार्टीमध्ये आलिया-रणबीरची हटके एन्ट्री, पाहा Inside Photos

बॉलिवूडमधील हॉट कपल मलायका अरोरा-अर्जुन कपूर, करण जोहरसह इतर सेलिब्रेटींनी पार्टीला खास उपस्थित होते.

  मुंबई, 25 डिसेंबर: करिना कपूर (Kareena Kapoor)आणि सैफ अली(Saif Ali Khan) खानने मंगळवारी रात्री आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत ख्रिसमसची सेलिब्रेशन पार्टी आयोजित केली होती. या पार्टीसाठी खास बॉलिवूडमधील सिनेतारकांनी हजेरी लावली होती. सैफ आणि करिनाच्या घरी असलेल्या पार्टीत बॉलिवूडमधील हॉट कपल मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर उपस्थित होते. यासोबत आलिया भट्ट आणि रणबीर कपूर एकत्र पार्टीचा आनंद घेताना चाहत्यांना पाहायला मिळाले. करिनाने या पार्टीचे फोटो आपल्या इन्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. अमृताची मुलगी सारा अली खान आणि मुलगा इब्राहिम यांची विशेष उपस्थिती होती. या पार्टीतील काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. पार्टीमध्ये करण जोहर सोबक आलिया, रणबीर, मलायका, अर्जुन, अमृता अरोरा, नताशा पूनावाला, सारा अली खान यांच्यासह इतर अनेक सेलिब्रिटींचे फोटो समोर आले आहेत. ख्रिसमस निमित्तानं खास करिना आणि सैफ दोघांनी मिळून ही पार्टी आपल्या घरी आयोजित केल्याचं सांगितलं जात आहे. या पार्टीतले काही खास फोटो मात्र सोशल मीडियावर तुफान धुमाकूळ घालत आहे.
  View this post on Instagram

  #christmas bunnies #KareenaKapoor #malaikaarora #amritaarora

  A post shared by Manav Manglani (@manav.manglani) on

  सारा अली खानने तिच्या भावासोबत खास ख्रिसमस पार्टीचे सेलिब्रेशन केलं. साराने आपल्या भावासोबत केलेल्या सेलिब्रेशनचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
  या पार्टीमध्ये करिनाचा थोडा हटके लूक चाहत्यांना घायाळ करणारा आहे. नेहमीच हॉट आणि सेक्सी दिसणाऱ्या करिनाचा हा लूकही तितकाच सुंदर असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. या पार्टीत करिनाने टायगर प्रिंट ड्रेस घातल्याचं दिसत आहे. तर मलायका रेड पँट आणि सूटमध्ये असल्याचं पाहायला मिळालं.
  View this post on Instagram
   

  Awesomeness Besties #MalaikaArora #KareenaKapoor #Karismakapoor #amritaarora

  A post shared by Manav Manglani (@manav.manglani) on

  रणबीर आणि आलियाची जोडी लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगत असतानाच दोघही या पार्टीमध्ये एकत्र दिसून आले. दोघांनीही या पार्टीत धमाल केली. त्याच्या या हटके एन्ट्रीची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. मागच्या आठवड्यात सैफ आणि करिनाने तैमूरचा वाढदिवस मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला होता. त्याची थीमही ख्रिसमस होती असं सांगितलं जात आहे. या पार्टीतही अनेक सिनेतारकांनी उपस्थित राहून तैमूरला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या होत्या. सध्या करिना कपूर आपल्या गूड न्यूज या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जात आहे. हा चित्रपट 27 डिसेंबर रोजी बॉक्सऑफिसवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. करिना कपूरसोबत अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'गुड न्यूज' हा चित्रपट दोन विवाहित दाम्पत्याची स्टोरी असून ते आयव्हीएफच्या माध्यमातून आईवडील होण्याचा निर्णय घेतात. पण आडनावं सारखी असल्याने अक्षय आणि दिलजीतच्या पात्रांच्या स्पर्मची अदलाबदली होती. त्यातून उडणारा गोंधळ या चित्रपटात बघायला मिळणार आहे. राज मेहता दिग्दर्शित हा चित्रपट 27 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
  Published by:Akshay Shitole
  First published:

  Tags: Aaliya bhat, Arjun kapur, Karina kapoor, Malaika arora, Ranbir kapur, Saif Ali Khan

  पुढील बातम्या