मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

मोठी बातमी! 20 कोटींपेक्षा जास्त टॅक्स चोरीमध्ये Sonu Sood चा सहभाग, Income Tax च्या छापेमारीत धक्कादायक खुलासा

मोठी बातमी! 20 कोटींपेक्षा जास्त टॅक्स चोरीमध्ये Sonu Sood चा सहभाग, Income Tax च्या छापेमारीत धक्कादायक खुलासा

लॉकडाऊन काळात अनेकांसाठी 'देवदूत' ठरलेल्या अभिनेता सोनू सूदच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. आयकर विभागाच्या माहितीनुसार सोनू सूदचा 20 कोटींपेक्षा जास्तच्या करचोरीमध्ये (Actor Sonu Sood involved in Tax Evasion) सहभाग आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 18 सप्टेंबर: लॉकडाऊन काळात अनेकांसाठी 'देवदूत' ठरलेल्या अभिनेता सोनू सूदच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. आयकर विभागाच्या माहितीनुसार सोनू सूदचा 20 कोटींपेक्षा जास्तच्या करचोरीमध्ये (Actor Sonu Sood involved in Tax Evasion) सहभाग आहे. आयकर विभागाने आरोप केला आहे की अभिनेता सोनू सूदच्या चॅरिटी फाउंडेशनने देशाबाहेरील देणगीदारांकडून 2.1 कोटी गोळा केले आहेत. यात एफसीआरए नियमांचे उल्लंघन झाल्याचा प्रकार घडला आहे. हे प्रकरण लवकरच सीबीआयकडे जाण्याची शक्यता आहे. गृहमंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, एफसीआरएच्या 1 कोटीपेक्षा जास्त उल्लंघनाची चौकशी सीबीआयकडून केली जाते.

NDTV इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेता सोनू सूदवर आयकर विभागाच्या छापेमारीनंतर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) म्हटले आहे की, त्याच्याविरोधात 20 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर चोरीचे प्रकरण समोर आले आहे.

हे वाचा-Sidharth Shukla Duplicate: हुबेहूब सिद्धार्थ शुक्लासारखा दिसणारा तरुण होतोय ....

सीबीडीटीने अशी माहिती दिली आहे की, अभिनेता सोनू सूद आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या ठिकाणी घेतलेल्या शोधादरम्यान  करचुकवेगिरीशी संबंधित पुरावे सापडले आहेत. सीबीडीटीने अशी माहिती दिली आहे की अभिनेत्याने बनावट संस्थांकडून बनावट आणि असुरक्षित कर्जाच्या स्वरुपात बेहिशोबी रक्कम जमा केली होती.

सीबीडीटीने दिलेल्या माहिनुसार, सोनूच्या विविध ठिकाणांवर छापेमारीची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये मुंबईतील काही ठिकाणांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे आयकर विभागाने इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमधील लखनऊ स्थित औद्योगिक समुहावर देखील छापेमारी आणि जप्तीची कारवाई केली आहे. एकूण 3 दिवसांपासून ही छापेमारी सुरू असून साधारण 28 ठिकाणांवर ही छापेमारी करण्यात आली. यामध्ये मुंबई, लखनऊ, कानपूर, जयपूर, दिल्ली आणि गुरुग्राममधील ठिकाणांचा समावेश आहे.

हे वाचा-Bigg Boss Marathi:पहिल्यांदाच बिग बॉसच्या घराची संपूर्ण झलक आली समोर; PHOTO

कोरोना महासाथीदरम्यान सोनू सूदने गरजूंना मोठी मदत केली आहे. माध्यमांसह सर्वसामान्यांनी देखील सोनूच्या कामाचं मोठं कौतुक केलं आहे. कोरोना महासाथीदरम्यान घरी परतणाऱ्या मजुरांना सोनूने वाहनांची व्यवस्था करून दिला, तर अनेकांना आर्थिक साहाय्य केलं. गेल्या काही दिवसांपासून सोनू सूद राजकारणात येऊन निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र आयकर विभागाने सोनूच्या विविध ठिकाणांवर छापेमारी केल्यानंतर पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे. यावेळी त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे.

First published:

Tags: Sonu Sood