मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

आलिया भट्टने 'RRR' मध्ये 15 मिनिटांचा रोल करण्यासाठी घेतले इतके कोटी

आलिया भट्टने 'RRR' मध्ये 15 मिनिटांचा रोल करण्यासाठी घेतले इतके कोटी

दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या (SS Rajamouli) 'RRR'  सिनेमात अभिनेत्री आलिया भट्टही (Alia Bhatt) महत्त्वाच्या भूमिकेत असून, ती सीतेच्या भूमिकेत दिसत आहे. या सिनेमासाठी तिनं तगडी फी घेतल्याची चर्चा आहे.

दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या (SS Rajamouli) 'RRR' सिनेमात अभिनेत्री आलिया भट्टही (Alia Bhatt) महत्त्वाच्या भूमिकेत असून, ती सीतेच्या भूमिकेत दिसत आहे. या सिनेमासाठी तिनं तगडी फी घेतल्याची चर्चा आहे.

दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या (SS Rajamouli) 'RRR' सिनेमात अभिनेत्री आलिया भट्टही (Alia Bhatt) महत्त्वाच्या भूमिकेत असून, ती सीतेच्या भूमिकेत दिसत आहे. या सिनेमासाठी तिनं तगडी फी घेतल्याची चर्चा आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 27 नोव्हेंबर- दिग्दर्शक एसएस राजामौली (SS Rajamouli) यांच्या बाहुबली (Director of Bahubali) चित्रपटाने भारतीय चित्रपट सृष्टीची परिभाषा बदलली होती. त्यांच्या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवलं होतं. त्याचबरोबर बाहुबली चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. अशा या गुणवान दिग्दर्शकाचा 'RRR' हा सिनेमा (RRR Movie) गेल्या अनेक दिवसांपासून चाहत्यांची उत्कंठा वाढवत आहे. मल्टिस्टारर चित्रपट पाहण्यासाठी देशभरातील प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपट पुढील महिन्यात (7 जानेवारी 2022) भारतातील अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रमोशनल इव्हेंटसाठी सज्ज आहे.'RRR'मध्ये सुपरस्टार राम चरण रामचरण (Ram Charan) आणि ज्युनियर एनटीआर (Jr NTR) मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टही (Alia Bhatt) महत्त्वाच्या भूमिकेत असून, ती सीतेच्या भूमिकेत दिसत आहे. दरम्यान, 'डियर जिंदगी' फेम अभिनेत्रीला खूप छोटी भूमिका या चित्रपटात मिळाल्याची माहिती समोर आलेली आहे.

रिपोर्ट्सनुसार, राजामौली (SS rajamouli) यांच्या चित्रपटात आलिया केवळ 15 मिनिटांसाठी पडद्यावर दिसणार आहे. 'RRR' हा स्टुडंट ऑफ द इयर फेम अभिनेत्रीचा पहिला तेलुगू चित्रपट आहे, ज्याद्वारे तिने दक्षिण चित्रपटात (Tamil Film Industry) पदार्पण केले. आलिया मुख्य भूमिकेत दिसेल असे हिंदी प्रेक्षकांना वाटत होते पण आता या चित्रपटात तिची फारशी भूमिका नसल्याची चर्चा आहे.

वाचा: रिंकू राजगुरू ब्रालेटमध्ये दिसली टोन्ड बॉडी प्लॉन्ट करताना; ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते सैराट

राजामौली यांच्या चित्रपटात काम करण्याचे आलियाचे होते स्वप्न

मिळालेल्या माहितीनुसार, आलियाने 10 दिवस या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये भाग घेतला होता. रिपोर्ट्सनुसार, ती फक्त 15 मिनिटांच्या रनटाइमसाठी दिसते. तिने रामचरणच्या पत्नी अल्लुरी सीताची भूमिका साकारली आहे. महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांची मुलगी राजामौली यांची खूप मोठी फॅन आहे आणि तिला नेहमीच त्यांच्या चित्रपटात काम करायचे होते. त्यामुळे तिला RRR चित्रपटात काम करण्याची संधी आल्यावर आलियाने लगेच हो म्हटलं. या चित्रपटातील तिची व्यक्तिरेखा लहान असली तरी तिच्यासाठी तिने चांगली फी मागितली आहे.

View this post on Instagram

A post shared by RRR Movie (@rrrmovie)

आलियाने 'RRR' साठी इतकी फी मागितली होती

TOI दिलेल्या वृत्तानुसार, आलियाने राम चरणच्या (Ram charan) विरुद्ध काम करण्यासाठी 6 कोटी रुपयांची मागणी केली आहे. टॉलिवूडमध्ये एकाही अभिनेत्रीला लीड भूमिका करण्यासाठी इतकी फी मिळत नाही. आलिया बॉलिवूडची सुपरहिट अभिनेत्री आहे. त्यामुळे RRR च्या टीमने तिने जेवढी फी मागितली ती देण्यास नकार दिला आहे. बॉलिवूडचा 'सिंघम' फेम अजय देवगणही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे.

First published:

Tags: Bollywood News, Entertainment, Tollywood