Home /News /entertainment /

रिंकू राजगुरू ब्रालेटमध्ये दिसली टोन्ड बॉडी प्लॉन्ट करताना; ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते सैराट

रिंकू राजगुरू ब्रालेटमध्ये दिसली टोन्ड बॉडी प्लॉन्ट करताना; ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते सैराट

रिंकू राजगुरूचा असा फोटो तुम्ही कधी पाहिला नसेल. (Rinku Rajguru Latest Photoshoot )तिचे ब्रालेटमधील काही हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. चाहत्यांकडून तिच्या या हॉट फोटोंवर कमेंटचा वर्षाव सुरू आहे.

  मुंबई, 27 नोव्हेंबर- सैराट चित्रपटातून तरुणांच्या हृदयात आणि लोकांच्या घराघरात पोहोचलेली रिंकू राजगुरू आपल्या अभिनयानं लोकप्रिय ठरली. रिंकू राजगुरू (Rinku Rajguru)सोशल मीडियावर नेहमी अॅक्टीव असते. ती तिचे विविध फोटो , व्हिडिओ तसेच तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. सध्या रिंकू राजगुरूने (Rinku Rajguru Latest Photoshoot )तिचे ब्रालेटमधील काही हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. चाहत्यांकडून तिच्या या हॉट फोटोंवर कमेंटचा वर्षाव सुरू आहे. रिंकूनं ब्लॅक रंगाच्या ब्रालेटमध्ये तिचे काही फोटो इन्स्टावर शेअर केले आहे. यामध्ये ती तिची टोन्ड बॉडी प्लॉन्ट करताना दिसत आहे. तिच्या या बोल्ड अंदाजवर चाहते फिदा झाले आहेत. अनेकांनी रिंकूचा हा अंदाज पाहून हार्ट इमोजी पोस्ट केल्या आहेत. रिंकूने शेअर केलेल्यामफोटोमध्ये तिने बॉडी फिट ब्रा व काळी पॅन्ट घातली आहे. तिचं हे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. तिचा हा फिटनेसफ्रीक अंदाज पाहून ती सिनेसृष्टीतील फिट आणि फाईट अभिनेत्री आहे असचं म्हणावे लागेल. हे पण फोटो हे फोटो पाहून चाहत्यांनी अक्षरशः कमेंटचा वर्षाव केला आहे. एका युजरने लिहिले आहे की, तू कितनी बदल गई रे रिंकू. सर्व जण तिच्या कष्टाचे आणि तिच्या टोन्ड बॉडीचे कौतुक करताना दिसत आहेत.
  रिंकू सोशल मीडियावर नेहमी फिटनेसचे व्हिडिओ , फोटो पोस्ट करत असते. सैराटची आर्ची ती आताची रिंकू यामध्ये खूपच बदल झालेला आहे. रिंकूचा फिटनेसफ्रिक अंदाज नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. आता देखील तिचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. वाचा :VIDEO : उर्वशी रौतेलाने सोलमेटबद्दल खुलासा करताच चाहत्यांना झाली 'या' क्रिकेटरची आठवण रिंकूनं सैराटनंतर ‘कागर’, ‘मेकअप’, ‘अनपॉज’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले व तिच्या अभिनयाचे कौतुक झाले. लवकरच ती ‘झुंड’ या चित्रपटात दिसणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटात आर्चीसोबत तिचा परशा म्हणजे अभिनेता आकाश ठोसर देखील दिसणार आहे. तसेच अभिनेते अमिताभ बच्चन हे सुद्धा या चित्रपटा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Bollywood, Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या