मुंबई, 01 जुलै : टॉयलेट एक प्रेम कथा या सिनेमाच्या यशानंतर आणि त्याला मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार हा आता लवकरच 'टॉयलेट-2' आणण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी त्याने ट्विटरवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे.
टॉयलेट एक प्रेम कथा या सिनेमाचा आता दुसरा भाग लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. त्यासाठी त्याने ट्विटवर एक व्हिडिओ शेअर केला. आणि त्या तो म्हणाला की, 'टॉयलेट तर बनवून झालं पण कथा अजून बाकी आहे. त्यामुळे मी घेऊन आलोय टॉयलेट पार्ट 2'
Time to get ready for the next Blockbuster - Mission #Toilet2! Iss baar badlega poora desh! Coming soon. pic.twitter.com/eutHICLlKp
— Akshay Kumar (@akshaykumar) June 30, 2018
आता या भाग 2 मध्ये अक्षय चाहत्यांसाठी काय नवी कहानी घेऊन आला आहे ते पाहणं महत्त्वाचं आहे. टॉयलेट सिनेमाच्या पहिल्या भागाला चाहत्यांनी भरभरून पाठिंबा दिला. तसाच प्रतिसाद भाग 2ला मिळणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Akshay Kumar, Bollywood, Movie, Toilet 2, Video