मुंबई, 15 मे : बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि आयुषमान खुरानानंतर (Ayushmann Khurrana) विद्या बालनचा शकुंतला देवी हा सिनेमा आता ऑनलाइन रिलीज करण्यात येणार आहे. कोरोना व्हायरसचं संक्रमण टाळण्यासाठी आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर 13 मार्चनंतर चित्रपटगृहांमध्ये सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी स्थगिती देण्यात आली आहे. विद्या बालनचा शकुंतला देवी हा सिनेमा 8 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र कोरोनामुळे प्रदर्शित करण्यात आला नाही. सिनेमा प्रेमींसाठी हा ऑनलाइन रिलीज करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
'हे सांगायला खूप आनंद होत आहे की शंकुतला देवी सिनेमा लवकरच amazon प्राइमवर आपल्या भेटीला येणार आहे' असं कॅप्शन देऊन विद्या बालननं शकुंतला देवीच्या पोस्टरचा फोटो टाकून यासंदर्भात माहिती दिली आहे. हा सिनेमा amazon प्राइमवर कधी येणार या संदर्भात अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही. मात्र लॉकडाऊनच्या काळात घरी बसून कंटाळलेल्या प्रेक्षकांसाठी ही नक्कीच खास पर्वणी असेल.
हा सिनेमा शकुंतला देवी यांच्या जीवनावर आधारीत आहे. त्या गणित विषयात निपुण होत्या. त्यांची प्रतिभा पाहून जगभरातील अनेक गणिततज्ज्ञ आश्चर्यचकित झाले होते. हा चित्रपट अनु मेनन यांनी दिग्दर्शित केला आहे.
हे वाचा-"51 वर्षांत हेच बघायचं राहिलं होतं...", अमिताभ यांनी असं का म्हटलं? वाचा सविस्तर
T 3531 -Joined Film Ind., in 1969 .. in 2020 .. its 51 years !! .. seen many changes and challenges .. NOW another CHALLENGE ..
DIGITAL RELEASE of my film GULABO SITABO !!
June 12 Amazon Prime 200 country's .. THAT IS AMAZING !
Honoured to be a part of yet another change pic.twitter.com/ccH2Qxh92D
— Amitabh Bachchan (@SrBachchan) May 14, 2020
बिग बी अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना यांनी शुजित सरकार दिग्दर्शित 'गुलाबो सिताबो' (Gulabo Sitabo) चित्रपट पहिल्यांदा थिएटरऐवजी Amazon प्राइमवर रिलीज करण्याची घोषणा केली आहे. हा चित्रपट 12 जूनला 200 हून अधिक देशांमध्ये अमेझॉन प्राइमवर पाहता येणार आहे. थिएटर मालकांमध्ये काहीशी नाराजी असली तरीही लॉकडाऊनमध्ये घरी असलेल्या चित्रपट प्रेमींसाठी मात्र ही खूशखबर आहे.
डिजील माध्यम, कोरोनाचं संकट आणि बदलती टेक्नोलॉजी लक्षात घेता बदल आणि आव्हान अशा दोन्ही गोष्टी आपण करायला हव्यात असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 'गुलाबो सिताबो' या चित्रपटाची माहिती त्यांनी ट्वीट करून दिली आहे.
हे वाचा-मोलकरणीला KISS करून केलं हैराण, शिल्पा शेट्टीने पतीची केली धुलाई; VIDEO VIRAL