मुंबई, 14 मे : बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि आयुष्मान खुरान (Ayushmann Khurrana) यांची फिल्म गुलाबो सिताबो (Gulabo sitabo) 12 जूनला रिलीज होणार आहे. या चित्रपटाची रिलीज डेट जारी होताच अमिताभ यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. 51 वर्षांत हेच बघायचं राहिलं होतं, असं अमिताभ बच्चन म्हणालेत.
अमिताभ यांची ही प्रतिक्रिया गुलाबो सिताबोच्या रिलीजबाबत आहे. कारण ही फिल्म थिएटर्समध्ये नाही तर डिजीटल रिलीज होणार आहे. OTT प्लेटफॉर्म अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर (Amazon Prime Video) प्रदर्शित होणार आहे.
यानंतर बिग बी यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे, ज्यात ते म्हणाले, "1969 साली मी फिल्म इंडस्ट्रीत आलो. आता 2020 आहे, म्हणजे 51 वर्षे झाली. इतक्या वर्षात मी अनेक बदल पाहिलेत आणि अनेक आव्हानं झेलली आहेत आणि आता आणखी एक आव्हान. माझ्या फिल्मचं डिजीटल रिलीज. गुलाबो सिताबो... 12 जून... अॅमेझॉन प्राइमवर... संपूर्ण जगभरात एकत्र... 200 देशांमध्ये... हे मजेशीर आहे. अशा आणखी एका आव्हानाचा भाग होता आलं, याचा मला अभिमान वाटतो आहे"
Advance mein aapko book kar rahe hai!
Gulabo Sitabo premieres this June 12 only on @PrimeVideoIN aa jaana fir, first day, first stream karne#GiboSiboOnPrime #WorldPremiereOnPrime @SrBachchan @ShoojitSircar @ronnielahiri #SheelKumar #JuhiChaturvedi @filmsrisingsun @Kinoworksllp pic.twitter.com/OdkWRkCPsC
— Ayushmann Khurrana (@ayushmannk) May 14, 2020
गेल्या वर्षी मेमध्ये या फिल्मची घोषणा करण्यात आली होती. शूजित सरकारचा हा चित्रपट यावर्षी 17 एप्रिलला रिलीज होणार होता, मात्र मार्चमध्ये लॉकडाऊन लागू झाला. त्यामुळे आता ही फिल्म ऑनलाइन रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या चित्रपटात अमिताभ आणि आयुष्मान यांची मजेदार जोडी आहे. अमिताभ बच्चन घरमालक आहेत, तर आयुष्मान घराचा भाडेकरू. एक भाडेकरू आणि घरमालक यांच्यातील लढाईची मजेशीर अशी ही कथा आहे.
हे वाचा - "मला तुझा अभिमान वाटतो", कोरोनाशी लढणाऱ्या जवळच्या व्यक्तीला मलायकाचं सॅल्युट
लॉकडाऊनमुळे बॉलीवूड चित्रपटांचंही मोठं नुकसान होतं आहे. गेल्या 2 महिन्यांत बॉक्स ऑफिसवर फिल्म रिलीज होत नाही आहेत. ज्यामध्ये सूर्यवंशी, राधे, संदीप और पिंकी फरार अशा बिग बजेटवाल्या चित्रपटांचा समावेश आहे, जे रिलीज होऊ शकले नाहीत. त्यामुळे मेकर्सनी आता आपल्या फिल्मचं रिलीज थांबवण्यापेक्षा त्या ऑनलाइन रिलीज करायला सुरुवात केली आहे.
हे वाचा - OMG! इंडियन Mr. Bean; तुम्ही हे व्हिडीओ पाहिलेत की नाही?
संपादन - प्रिया लाड