मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

मोलकरणीला KISS करून केलं हैराण, शिल्पा शेट्टीने पतीची केली धुलाई; VIDEO VIRAL

मोलकरणीला KISS करून केलं हैराण, शिल्पा शेट्टीने पतीची केली धुलाई; VIDEO VIRAL

शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty)आणि राज कुंद्रा (Raj Kundra) यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty)आणि राज कुंद्रा (Raj Kundra) यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty)आणि राज कुंद्रा (Raj Kundra) यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

  • Published by:  Priya Lad
मुंबई, 14 मे : कोणत्याही पत्नीला आपल्या पतीनं दुसऱ्या महिलेचं साधं कौतुक केलेलंही आवडत नाही. मग ती एक सामान्य महिला असो वा एखादी सेलिब्रिटी. अभिनेत्री शिल्पा शेट्टीलाही (Shilpa shetty) आपल्या पतीनं मोलकरणीला किस केल्याचं समजताच तिनं त्याची चांगलीच धुलाई केली आहे. शिल्पा आणि तिचा पती राज कुंद्रा (Raj kundra) यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. शिल्पानं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तिला आपला पती मोलकरणीला किस करून हैराण करत असल्याचं समजतं आणि ती त्याची पिटाई करते. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला हसू आवरणार नाही.
हा एक टिकटॉक (Tiktok) व्हि़डिओ आहे. ज्यात शिल्पा आपलं कपाट आवरत असते आणि त्यावेळी राज तिला किस करत असतात. 'कामाच्या वेळी किस करू नको', म्हणून शिल्पा आपल्या पतीला दटावते. हे वाचा - "51 वर्षांत हेच बघायचं राहिलं होतं...", अमिताभ यांनी असं का म्हटलं? वाचा सविस्तर शिल्पा असं बोलताच त्यांची मोलकरीण, 'मॅडम चांगल्या पद्धतीनं समजवा, मी तर बोलून बोलून थकले', असं सांगते. मोलकरीणीच्या तोंडून हे ऐकताच शिल्पा आपल्या पतीला मारायला सुरुवात करते. हा व्हि़डिओ शेअर करताना शिल्पाने, 'नजर हटी, दुर्घटना घटी!  सच्चाई पता चलने पर, पिट गए हमारे पति' अशी पोस्ट लिहिली आहे. या व्हिडिओत शिल्पानं डबल रोल केला आहे. शिल्पाकडे पतीची तक्रार करणारी मोलकरीणही शिल्पाच आहे. हे वाचा - OMG! इंडियन Mr. Bean; तुम्ही हे व्हिडीओ पाहिलेत की नाही? शिल्पा आपल्या सोशल मीडियावर असे मजेशीर व्हिडिओ शेअर करत असते. याआधीही शिल्पा शेट्टीचा एक व्हिडिओ व्हायरल झाल होता, ज्यात शिल्पा आपल्या प्रश्नांची राज यांना इतकं सतवते की, ते तिच्यावर भडकतात. तसंच मॉर्डन महाभारतवाला टिकटॉक व्हिडिओ लोकांना आवडला होता, ज्यात शिल्पा आपल्या पतीसह युद्ध करताना दिसली. शिल्पाच्या टिकटॉक व्हिडिओत तिचा मुलगाही अनेकदा दिसला आहे. संपादन - प्रिया लाड
First published:

Tags: Raj kundra, Shilpa shetty, Tiktok

पुढील बातम्या