जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / लग्नानंतर अभिनेत्री यामी गौतमनं बदललं आपलं नाव; हे आहे नवं नाव

लग्नानंतर अभिनेत्री यामी गौतमनं बदललं आपलं नाव; हे आहे नवं नाव

लग्नानंतर अभिनेत्री यामी गौतमनं बदललं आपलं नाव; हे आहे नवं नाव

नुकताच यामीने आपल्या आगामी ‘भूत पुलिस’ या चित्रपटाचं पोस्टर शेयर केलं होतं. ही पोस्ट सर्वांनाचं थोडी खास वाटली.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 18 ऑगस्ट- मनोरंजनसृष्टीत जणू लग्नाचा सिझनचं सुरु होता. गेल्या काही महीन्यांमध्ये अनेक कलाकार लग्नबंधनात अडकले आहेत. बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री यामी गौतमने (Yami Gautam Wedding) आपल्या लग्नाचे फोटो शेयर करत सर्वांनाचं सुखद धक्का दिला होता. कोणालाही भनक न लागता यामी अचानक लग्नबंधनात अडकली होती. यामीने काही महिन्यांपूर्वी दिग्दर्शक आदित्य धरसोबत(Aaditya Dhar) लग्न केलं आहे. लग्नानंतर यामी सतत विविध कार्यक्रमांचे फोटो शेयर करत आहे. मात्र नुकताच एक खास गोष्ट पाहायला मिळाली आहे. यामीने आत्ता आपलं इन्स्टाग्रामवरील नावदेखील बदललं आहे. अभिनेत्री यामी गौतम आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असते. नुकताच यामीने आपल्या आगामी ‘भूत पुलिस’ या चित्रपटाचं पोस्टर शेयर केलं होतं. ही पोस्ट सर्वांनाचं थोडी खास वाटली. कारण या पोस्टमध्येलक्षात येत होतं, की यामीने आपल्या नावात बदल केला आहे. यामीने लग्नानंतर आपल्या सोशल मीडियावरील नावात बदल करत यामी गौतम धर असं केलं आहे. (हे वाचा: राखी सावंतचा काही नेम नाही; चक्क स्पायडर वुमन बनून फिरतेय ड्रामा क्वीन ) यामी गौतम बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. फार कमी वेळेत यामीने आपली एक खास ओळख निर्माण केली आहे. यामीने छोट्या पडद्यावरून आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती. यामीला टीव्ही मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. त्यांनतर यामीने चित्रपटांकडे आपला मोर्चा वळवला होता. आणि बघता बघता यामध्ये तिला लोकप्रियतादेखील मिळाली होती. यामीने अनेक चांगल्या चित्रपटांमध्ये काम करून आपल्या अभिनयाची छाप सर्वांवर पाडली आहे. (हे वाचा: सिद्धार्थने शेयर केलं कॅप्टन विक्रम बत्रांनी लिहिलेलं पत्र; वाचून तुम्हीही व्हाल ) तसेच यामी गौतम ही एकमेव किंवा पहिलीचं अभिनेत्री नाहीय, की जिने लग्नानंतर आपलं नाव बदललं आहे. यापूर्वी बॉलिवूडची बेबो म्हणजेच अभिनेत्री करीना कपूरने आपल्या नावापुढे खान लावलं आहे. तसेच देसी गर्ल प्रियंका चोप्रानेसुद्धा लग्नानंतर आपल्या नावात बदल करत आपल्या नावापुढे जोनस असं लावलं आहे. सावरिया गर्ल सोनम कपूरनेसुद्धा लग्नानंतर आपल्या नावापुढे अहुजा लावलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात