Home /News /entertainment /

वयातील अंतरावरुन टीका करणाऱ्यांना गौहर खानचं सणसणीत उत्तर; म्हणाली झैद आणि मी...

वयातील अंतरावरुन टीका करणाऱ्यांना गौहर खानचं सणसणीत उत्तर; म्हणाली झैद आणि मी...

अभिनेत्री गौहर खान (Gauahar Khan) आणि कोरिओग्राफर झैद दरबार (Zaid Darbar) येत्या 25 डिसेंबरला लग्नगाठ बांधणार आहेत. वयातील अंतरामुळे त्यांच्यावर टीका होत आहे.

    मुंबई, 02 डिसेंबर: अभिनेत्री गौहर खान (Gauahar Khan) आणि कोरिओग्राफर झैद दरबार (Zaid Darbar) येत्या 25 डिसेंबरला लग्नगाठ बांधणार आहेत. हे सेलिब्रिटी कपल त्यांच्यातील वयाच्या अंतरामुळे चर्चेत आहे. मात्र अभिनेत्री गौहर खानने वयाच्या अंतराचा झैद बरोबरच्या आपल्या नात्यावर कोणताही फरक पडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. छोटा पडदा गाजवणारी अभिनेत्री गौहर खान बिग बॉसच्या (Big Boss-7) सातव्या पर्वाची विजेती असून, झैद कोरिओग्राफर आहे. तर झैद गायक, संगीतकार इस्माईल दरबार (Ismail Darbar) यांचा मुलगा आहे. दोघेही सोशल मीडियावर आपल्या नात्यासंबधी चाहत्यांना माहिती देत असतात. चाहतेही या सुंदर जोडीच्या नवनवीन पोस्टसच्या प्रतीक्षेत असतात. अनेकांनी त्यांच्या वयातील अंतराकडे बोट दाखवत कमेंटस केल्या आहेत. अनेकांनी गौहर झैदपेक्षा 12 वर्षांनी मोठी असल्याचे म्हटले आहे. यावर गौहरने आपल्या आणि झैदच्या वयात इतके अंतर नसल्याचा खुलासा केला आहे. याबाबत ई-टाईम्सशी (E -Times) बोलताना ती म्हणाली, आमच्या दोघांच्या वयातील अंतराचा जो आकडा बाहेर सांगितला जात आहे, तो चुकीचा आहे. झैद 25 वर्षांचा असल्याचे म्हटले जाते. तो माझ्यापेक्षा लहान आहे, पण 12 वर्षांनी नाही; मात्र वयाच्या मानाने तो खूपच प्रगल्भ (Mature) आहे. माझ्या आयुष्याला त्याला संतुलित केलं आहे. वयाच्या अंतरावरून टीका करणं, कमेंट करणं सोपं आहे. पण याचा त्या जोडप्याच्या नात्यावर परिणाम होऊ शकतो; अर्थात झैद आणि माझ्या नात्यावर अशा टीकेचा काहीही परिणाम होणार नाही. आमच्या दोघेही समजूतदार आहोत. तेवढी प्रगल्भता आमच्याकडे आहे. त्यामुळे आमचे नाते खूप मजबूत आहे.’ एका मुलाखतीत बोलताना झैदनेही वयातील अंतर आणि त्याबद्दलचा त्याचा दृष्टीकोन स्पष्ट केला होता. त्यांच्यातील समजूतदारपणा आणि प्रगल्भ नात्यावर विश्वास व्यक्त केला होता. गौहरमुळे त्याला कितीतरी गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणे शक्य झाल्याचे त्याने सांगितले होते. दोघांनाही आपल्या नात्याचे संतुलन छान सांभाळता येत असल्याचेही त्याने नमूद केले होते. ‘मला वाटते आम्ही दोघेही पुरेसे प्रगल्भ आहोत. त्याबाबतीत आम्ही समान आहोत. काही गोष्टी आहेत, जी ती मला समजावते. आम्ही दोघेही एकमेकासाठी योग्य आहोत,’ असे झैदने म्हटले आहे.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Bollywood

    पुढील बातम्या