बॉलिवूडची 'धकधक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित आजसुद्धा तितकीच सुंदर आहे. सध्या ती 53 वर्षांची असली तरी तिचा उत्साह आणि सौंदर्य जसंच्या तसं आहे. माधुरीने नुकतेच आपले गुलाबी रंगाच्या घागऱ्यातील फोटो पोस्ट केले आहेत. आजही तिचे फोटो चाहत्यांना वेड लावत आहेत.
माधुरी दीक्षित 53 वर्षांची झाली असली तरी तिचं सौंदर्य तसूभरही कमी झालेलं नाही. स्टाईल आणि सौंदर्याच्या बाबतीत ती आजच्या अभिनेत्रींना सुद्धा टक्कर देते.
अमित अग्रवाल या डिझायनरने हा गुलाबी घागरा डिझाईन केला आहे. माधुरीच्या या घागऱ्याची किंमत 165,000 रुपये इतकी आहे.
काही दिवसांपूर्वी माधुरीने मालदीव किनाऱ्यावरील आपले फोटो पोस्ट केले होते. त्याला सुद्धा चाहत्यांकडून भरभरून दाद मिळाली होती.
माधुरी दीक्षितला अनेक अभिनेत्री आपली आदर्श म्हणून बघतात. अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरीबद्दल माधुरीला 2008 मध्ये 'पद्मश्री' पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.