'इथं लोक मरतायेत आणि तू...', 'त्या' VIDEO मुळे पूजा बेदी होतेय ट्रोल; पाहा काय म्हणाली...

'इथं लोक मरतायेत आणि तू...', 'त्या' VIDEO मुळे पूजा बेदी होतेय ट्रोल; पाहा काय म्हणाली...

अभिनेत्री पूजा बेदी (pooja bedi) गोव्यात (goa) सुट्टीचा आनंद लुटत आहे. यादरम्यान तिनं एक व्हिडीओ (video post) पोस्ट केला आहे. त्यामुळे पूजा चांगलीच चर्चेत आली आहे.

  • Share this:

मुंबई, 16 एप्रिल – देशामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचा (coronavirus) कहर वाढत चालला आहे. लोकांना घरातून बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. कित्येक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. सर्वात जास्त रुग्णसंख्या महाराष्ट्रात (maharashtra) आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊनसारखे (lockdown) कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. तर दुसरीकडे बॉलिवूड कलाकार (bollywood stars) देशात तसंच देशाबाहेर जाऊन सुट्टीचा (vacation) आनंद घेत आहेत. अभिनेत्री पूजा बेदीसुद्धा (pooja bedi) आपल्या होणाऱ्या पतीसोबत गोव्यात (goa) सुट्टीचा आनंद लुटत आहे. यादरम्यान तिनं एक व्हिडीओ (video) पोस्ट केला आहे. या व्हिडीओमुळे तिला सोशल मीडियावर बरचं ट्रोल केलं जातं आहे.

अभिनेत्री पूजा बेदी सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. बऱ्याचवेळा ती वादाच्या भोवऱ्यातसुद्धा अडकते. सध्या पूजा बेदी आपल्या गोव्यात सुट्टीचा आनंद घेत आहे. तिच्यासोबत तिचा होणारा पतीसुद्धा आहे. यासुट्टी दरम्यानचा एक व्हिडीओ पूजाने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे, ज्यावरून तिला नेटिझन्सनी लक्ष्य केलं आहे.

पूजाने हा व्हिडीओ शेअर करताना त्याला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे, "आरोग्यदायी आणि आनंदी आयुष्यासाठी गोव्याचा आनंद घ्या. स्वतःला तणावमुक्त करा. कोणतीच भीती नाही, आपलं आयुष्य हे मोकळेपणाने जगण्यासाठी आहे. स्वतःला बंधिस्त करण्यासाठी नाही, या कोरोना व्हायरसच्या भीतीपोटी एक वर्ष मास्क नव्हे तर कित्येक वर्षे मास्क. हा व्हायरस इतक्यात आपली पाठ सोडणार नाही. सर्व काळजी घेऊनही प्रत्येकवेळी मास्क लावून, घरात बसूनसुद्धा आपल्याला मृत्यू आला तर? असं कोणतंही दु:ख राहायला नको"

हे वाचा - 'उतरण'च्या इच्छाचा हॉट अवतार; टीना दत्ताचे Bikini Photo Viral)

पूजाने हा व्हिडीओ पोस्ट करताच तो वेगाने सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट्स येत आहेत. अनेक लोक पूजाला ट्रोल करत आहेत. देशात सर्वत्र कोरोनाचा हाहाकार माजवला असताना. पूजाचं हे मत अनेकांना आवडलेलं नाही. पूजाच्या या व्हिडीओवर एकाने म्हटलं आहे ‘पैसे सद्विवेकबुद्धीला मारून टाकतात’, तर एकाने म्हटलं आहे ‘कोरोनामुळे दररोज कित्येक लोकांचा मृत्यू होतं आहे. तुम्ही तुमच्या विशेष अधिकारांची एकदा तपासणी करून घ्या. अशा शब्दांत अनेक युझर्सनी पूजावर रोष व्यक्त केला आहे.

हे वाचा - 'शराबी'मध्ये BIG B यांचा हात खिशातच का होता? 36 वर्षांनंतर सांगितलं कारण  )

पूजा ही ज्येष्ठ अभिनेता कबीर बेदींची मुलगी आहे. पूजाने आमिर खानच्या ‘जो जिता वही सिकंदर’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पूजा सतत चर्चेत असते. कधी आपल्या नात्यांना घेऊन कधी आपल्या हॉट अंदाजामुळे ट्रोल होतं असते. पूजाने काही वर्षांपूर्वी कंडोमची एक जाहिरात केली होती. मात्र ती अतिशय बोल्ड असल्याने त्यावर बंदी घालण्यात आली होती. त्यात पूजाने खूपच हॉट दृश्ये दिली होती. त्यासाठी सुद्धा ती चर्चेत आली होती. पूजाने फरहान फर्निचरवाला सोबत लग्न केलं होतं. मात्र 12 वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर हे दोघं विभक्त झाले आहेत. सध्या पूजा मॅनेक कॉन्ट्रॅक्टरसोबत नात्यात आहे. या दोघांनी साखरपुडा सुद्धा केला आहे. हे दोघे लवकरच लग्न करणार आहेत.

Published by: Aiman Desai
First published: April 16, 2021, 1:25 PM IST

ताज्या बातम्या