Home /News /entertainment /

Urvashi Rautela च्या हॉटनेसने लावली आग ; बिकिनी Video Viral

Urvashi Rautela च्या हॉटनेसने लावली आग ; बिकिनी Video Viral

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने (Urvashi Rautela) 25 फेब्रुवारीला तिचा वाढदिवस साजरा केला. सध्या ती मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

  मुंबई, 26 फेब्रुवारी-  बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने (Urvashi Rautela) 25 फेब्रुवारीला तिचा वाढदिवस साजरा केला. सध्या ती मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.मालदीवमध्ये पोहचताच उर्वशीने सोशल मीडियीवर तिच्या हॉटनेसने आग लागली आहे. तिनं एक बिकिनी व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे व यावर कमेंटचा वर्षाव होत आहे. फ्लोरा बिकिनीत फ्लॉन्ट करतान दिसली फिगर उर्वशी रौतेला (Urvashi Rautela VIDEO) तिच्या फिटनेस आणि परफेक्ट फिगरसानं नेहमीच सर्वांचे लक्षवेधून घेत असते. मात्र तिनं जो मालदीवमधून व्हिडिओ शेअर केला आहे त्यामुळे सोशल मीडियाचा पारा मात्र वाढला आहे. या व्हिडिओमध्ये ती समुद्र किनारी मस्ती करताना दिसत आहे. वाचा-'लय अंग दुखायले का..', वहिनीसाहेबांच्या ट्रेडिंग रील्सवर चाहत्याची भन्नाट कमेंट बर्थडेला घातली होते कोटीचे दागिने उर्वशी रौतेलाने (Urvashi Rautela) काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ शेअर केल होता. या व्हिडिओत तिनं हिऱ्याचे दागिने घातले होते. यामध्ये तिनं खऱ्या हिऱ्यांनी जडलेला दुहेरी लेयर नेकलेस, ब्रेसलेट, चेनच्या डिझाईनमधील लांब कानातले आणि मोठ्या हिऱ्यांच्या अंगठ्या घातलेली दिसत आहेत. ही ज्वेलरी आंतरराष्ट्रीय डिझायनर फर्न व्हॅन अमांटो यांनी डिझाईन केली आहे. ज्याची किंमत 1 दशलक्ष डॉलर्स म्हणजे भारतीय रुपयानुसार सुमारे साडेसात कोटी आहे.
  उर्वशी शेवटची मिस युनिव्हर्स 2021 स्पर्धा जज करताना दिसली होती. अरब सुपरस्टार मोहम्मद रमझानसोबतच्या 'वर्सासे बेबी' या गाण्यासाठीही तिची खूप प्रशंसा झाली. उर्वशी लवकरच जिओ स्टुडिओच्या वेब सीरिज 'इन्स्पेक्टर अविनाश'मध्ये रणदीप हुड्डासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. थ्रिलर 'ब्लॅक रोज' तसेच 'थिरुट्टू पायल 2' च्या हिंदी रिमेकमध्ये ती मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. उर्वशी 'द लीजेंड' या चित्रपटातून सरवनासोबत तामिळमध्ये पदार्पण करणार आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Bollywood News, Entertainment, Urvashi rautela

  पुढील बातम्या