मुंबई, 07 मार्च : काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Bollywood Actress Sonakshi Sinha) आणि अभिनेता सलमान खान यांचा एक फोटो व्हायरल (Viral) झाला होता. त्यावरून हे दोघं विवाहबद्ध झाले असल्याचा दावा केला जात होता. पण ही अफवा आहे. हा मॉर्फ्ड फोटो असल्याचं खुद्द सोनाक्षीनं सांगितलं होतं. पण या प्रकरणाची जोरदार चर्चा झाली होती. यातच आता सोनाक्षी सिन्हा अजून एका प्रकरणामुळे जोरदार चर्चेत आहे. या प्रकरणामुळे तिच्या अडचणींमध्ये आणखीनच वाढ होताना दिसत आहे. एका जुन्या प्रकरणात ती अडकण्याची चिन्हं आहेत. आर्थिक फसवणुकीच्या एका जुन्या प्रकरणात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा अजूनच अडकण्याची शक्यता आहे. या प्रकरणी ती यापूर्वीही न्यायालयात हजर राहिली होती. मात्र आता या प्रकरणाच्या फायली पुन्हा उघडल्या असून, न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील कोर्टाने तिच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं आहे. या खटल्याच्या सुनावणीसाठी तिला 25 एप्रिल 22 ला न्यायालयात (Court) हजर राहण्याचं या नोटिसीत म्हटलं आहे. सोनाक्षी सिन्हा आणि तिच्या साथीदारांवर 36 ते 37 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप आहे. यात सोनाक्षी, अभिषेक सिन्हा यांच्यासह अन्य पाच जणांविरोधात खटला सुरु आहे. कटघर येथील प्रमोद शर्मा (Pramod Sharma) यांनी 22 फेब्रुवारी 2019 रोजी पोलिस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल केला होता. हे वाचा - ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांना झाला आहे ‘हा’ आजार; स्वत: दिली माहिती मीडिया रिपोर्ट नुसार, तक्रारदार प्रमोद शर्मा हे इव्हेंट ऑर्गनायझिंग फर्म (Event Organising Farm) चालवतात. त्यांनी सांगितलं, “माझ्या कंपनीनं 30 सप्टेंबर 18 रोजी दिल्लीतील सिरी फोर्ट ऑडिटोरियममध्ये इंडिया फॅशन अँड ब्युटी अॅवॉर्ड कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. सोनाक्षीला या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यासाठी टॅलेंट फुल ऑन कंपनीचे संचालक अभिषेक सिन्हा आणि एक्सिड एंटरटेनमेंट यांच्याशी चर्चा झाली. चार जून 18 पर्यंत चार हप्त्यांत सोनाक्षीला 28 लाख 17 हजार रुपये ‘आरटीजीएस’च्या (RTGS) माध्यमातून ट्रान्सफर करण्यात आले होते. सोनाक्षी सिन्हा इव्हेंटला येईल, असं अभिषेक सिन्हा यांच्या कंपनीनं 21 जून 18 ला लेखी दिलं होतं. इव्हेंटचा प्रमोशनल व्हिडिओही प्रसारित करण्यात आला पण सोनाक्षी सिन्हा या इव्हेंटला आली नाही.” यानंतर प्रमोद शर्मा यांनी प्रयत्न करूनही त्यांना त्यांचे पैसे परत न मिळाल्याने त्यांनी सोनाक्षीविरोधात तक्रार दाखल केली. फेब्रुवारी 2019 मध्ये सोनाक्षीवर गु्न्हा दाखल करण्यात आला होता. “माझ्यावर चुकीचे आरोप करण्यात आले आहेत”, असं याप्रकरणी जारी केलेल्या निवेदनात सोनाक्षीनं म्हटलं होतं, याबाबतचं वृत्त इंडिया टाईम्स नं दिलं आहे. हे वाचा - घटस्फोटानंतर अरबाजकडून मिळाली 15 कोटींची पोटगी? मलायकानं सांगितलं सत्य आता या प्रकरणी उत्तर प्रदेशातल्या मुरादाबादच्या एसजीएम न्यायालयाने सोनाक्षीविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. तसेच 25 एप्रिलला न्यायालयात हजर राहण्याची नोटिस बजावण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय होणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.