जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / बापरे! ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांना झाला आहे 'हा' आजार; संवादादरम्यान स्वत:च दिली माहिती

बापरे! ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांना झाला आहे 'हा' आजार; संवादादरम्यान स्वत:च दिली माहिती

राजकीय वादांवर का बोलत नाहीत बॉलिवूडमधले तीनही खान्स? नसिरुद्दीन शाहांचा सवाल

राजकीय वादांवर का बोलत नाहीत बॉलिवूडमधले तीनही खान्स? नसिरुद्दीन शाहांचा सवाल

त्यांच्याकडे बघून त्यांचे वय इतके असेल असे वाटत नाही; मात्र त्यांना एका गंभीर आजाराने ग्रासले आहे. त्यांनी स्वत:च याबाबत माहिती दिली आहे.

    मुंबई, 07 मार्च:  वयाच्या 70व्या वर्षी सर्वसामान्य माणूस सर्व व्यापातून निवृत्त होतो. फार कमी लोक असतात जे कशात तरी स्वत:ला गुंतवून घेतात. हिंदी चित्रपटसृष्टीतही (Bollywood News) असे काही मोजकेच ज्येष्ठ कलाकार आढळतात 70व्या वर्षी किंवा त्याहूनही अधिक वयात कार्यरत आहेत. यात सर्वांत आघाडीचं नाव आहे बिग बी अमिताभ बच्चन (Big B Amitabh Bachchan) यांचे. त्यानंतर नंबर लागतो तो आपल्या कसदार अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये एक वेगळं स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांचा. वयाच्या 71 व्या वर्षीही ते चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. आजही ते चित्रपटांमध्ये हलक्याफुलक्या भूमिका करताना दिसतात. गेली अनेक वर्षे चित्रपटांमधून वेगवेगळ्या भूमिकांद्वारे रसिकांचे मनोरंजन करत आहेत. त्यांच्याकडे बघून त्यांचे वय इतके असेल असे वाटत नाही; मात्र त्यांना एका गंभीर आजाराने ग्रासले आहे. त्यांनी स्वत:च याबाबत माहिती दिली आहे. आजतकनं दिलेल्या वृत्तानुसार, नसीरुद्दीन शाह यांना ओनोमेटोमॅनिया (onomatomania) नावाच्या आजाराने ग्रासले आहे. एका यूट्यूब चॅनलशी संवाद साधताना त्यांनी स्वत:च या गोष्टीचा खुलासा केला आहे. ‘मला ओनोमेटोमॅनिया नावाच्या आजाराने ग्रासले आहे. मी विनोद करत नाही आहे. ही एक वैद्यकीय स्थिती आहे. तुम्ही डिक्शनरीमध्ये पाहू शकता,’ असंही त्यांनी सांगितलं. गुलाबी साडी अन् गुलाबी ओठ…रूपालीच्या अदांनी नेटकऱ्यांना लावलयं वेड या आजाराबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले, ‘ओनोमॅटोमॅनिया हा एक असा आजार आहे ज्यात तुम्ही कोणतेही शब्द, वाक्य, वाक्य, कविता किंवा भाषण कोणत्याही कारणाशिवाय पुन्हा सांगत राहता. माझ्यासोबत हे प्रत्येक क्षणी घडतं, त्यामुळे मी कधीही शांततेत जगू शकत नाही. मी झोपेत असतानाही मला आवडणारे काही उतारे बोलत राहतो,’ असंही त्यांनी सांगितलं. या आजाराच्या वर्णनावरून लक्षात येईल की हा किती गंभीर आजार आहे. मात्र तरीही नसीरुद्दीन शाह कार्यरत आहेत. नुकताच त्यांची महत्त्वाची भूमिका असलेला गहराईयाँ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. यात त्यांनी दीपिका पदुकोणच्या (Deepika Padukone) वडिलांची भूमिका साकारली आहे. या छोट्याशा भूमिकेतही त्यांनी आपली छाप पाडली आहे. याशिवाय ‘कौन बनेगा शिखरवती’ या वेबसिरीजमध्येही त्यांनी काम केलं आहे. कदाचित तुमच्या शेजारच्या रिक्षात असेल ही अभिनेत्री, ओळखा कोण ती? आपण आणि आपली पत्नी रत्ना पाठक (Ratna Pathak Shah) दोघांनाही पुस्तकांची (Books) प्रचंड आवड असल्याचं यावेळी नसीरुद्दीन शाह यांनी सांगितलं. दोघंही एकमेकांना पुस्तकं सुचवत राहतात मात्र ती पुस्तके क्वचितच खरेदी करतात. रत्ना पाठक यांना क्रिकेटची (Cricket) ओळख आपणच करून दिल्याचंही शहा यांनी सांगितलं. दोघांमध्ये आणखी एक आवड सारखी आहे ती म्हणजे टिन टिन कॉमिक (Tin Tin Comic) याकडेही त्यांनी लक्ष वेधलं

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात