बिग बॉसमधून नावारूपास आलेली सपना चौधरी एक प्रसिद्ध गायिका आणि डान्सर म्हणून ओळखली जाते. गेल्या काही काळात ती गाण्यांसोबतच आपल्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत राहू लागली आहे. ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोंद्वारे ती सर्वांचेच लक्ष वेधून घेते. यावेळेसही तिने असेच काही बोल्ड फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंवर काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.