Home /News /entertainment /

Mahesh Manjrekar ची मुलगी सई 'या' प्रसिद्ध निर्मात्याच्या मुलाला करतेय डेट, अशी सुरू झाली Love Story

Mahesh Manjrekar ची मुलगी सई 'या' प्रसिद्ध निर्मात्याच्या मुलाला करतेय डेट, अशी सुरू झाली Love Story

निर्माता आणि अभिनेते महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांची मुलगी अभिनेत्री सई मांजरेकरच्या (Saiee Manjrekar) डेटिंगची चर्चा सध्या सगळीकडे रंगली आहे.

  मुंबई, 22 फेब्रुवारी- Saiee Manjrekar Dating Subhan Nadiadwala: बॉलिवूड स्टारर्स म्हटलं की अफेअर्स ही आलीच. निर्माता आणि अभिनेते महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांची मुलगी अभिनेत्री सई मांजरेकरच्या (Saiee Manjrekar) डेटिंगची चर्चा सध्या सगळीकडे रंगली आहे. निर्माता साजिद नाडियाडवालाचा नाडियाडवाला (Sajid Nadiadwala) मुलगा सुभान नाडियाडवाला (Subhan Nadiadwala) सई डेट करत असल्याची चर्चा आहे. बॉलिवूड लाईफने याबद्दल वृत्त दिलं आहे. सईने 2019 मध्ये सलमान खानच्या 'दबंग 3' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. सुभाना नाडियाडवालाचे वडील साजिद नाडियाडवाला बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्मात्यांपैकी एक आहे. नाडियाडवाला ग्रॅंडसन एंटरटेनमेंटचे ते मालक आहेत. सलमानच्या जवळच्या मित्रापैकी साजिद नाडियाडवाल एक आहे. असं सांगितलं जातं की, सुभान देखीव वडिलांच्या पाऊलवार पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये करिअर करणार आहे. दिग्दर्शक म्हणून सुभान करिअर करणार आहे. वाचा--'प्रेमात फसवणूक ही तर', दीपिका रिलेशनशिपमधील चीटिंगवर पहिल्यांदा व्यक्त मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुभान नाडियाडवाला आणि सई मांजरेकर बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या माध्यमातून भेटले होते. सलमानची महेश मांजरेकर आणि साजिदसोबत खास बॉन्डिंग आहे. त्यामुळे नेहीमी गेट-टुगेदरमध्ये सई आणि सुभान भेटत असतात. यातूनच त्यांची जवळीकता वाढली. सुभान आणि सई सुरूवातीला चांगले मित्र होते. नंतर या दोघांनी डेटिंग सुरू केलं.
  सई आणि सुभान एकमेकांच्या नात्याबद्दल सीरियस आहे. या दोघांचे घरचे देखील याबाबत खूप सीरियस आहेत. हे कपल विकेंडला एकमेकांच्या घरी स्पॉट होत असतं.  सई सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रीय असते. तिचे विविध फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. तसेच तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती देत असते.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Bollywood actor, Bollywood News, Entertainment

  पुढील बातम्या