जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / साडी नेसूनही पुश अप्स शक्य! अभिनेत्रीनं केलं सिद्ध, VIDEO पाहून चाहते म्हणाले, Wonder Woman

साडी नेसूनही पुश अप्स शक्य! अभिनेत्रीनं केलं सिद्ध, VIDEO पाहून चाहते म्हणाले, Wonder Woman

साडी नेसूनही पुश अप्स शक्य! अभिनेत्रीनं केलं सिद्ध, VIDEO पाहून चाहते म्हणाले, Wonder Woman

माजी मिस इंडिया असलेली ही अभिनेत्री मान्यताप्राप्त पायलट आहे. तिला मोटारसायकल चालवण्याचाही आवड असून, ती एक उत्कृष्ट बायकर आहे. या 41 वर्षीय अभिनेत्रीने आपण कोणतीही फिटनेस अॅक्टिव्हिटी कधीही, कुठेही आणि कोणत्याही पोशाखात करू शकतो, हे दाखवून दिलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 27 नोव्हेंबर : अभिनेत्री गुल पनाग (Gul Panag) तिच्या फिटनेससाठी प्रसिद्ध आहेच. चित्रपटाखेरीज तिला अनेक इतर विषयांमध्येही रस आहे. अभिनेत्री आणि माजी मिस इंडिया (former Miss India) असलेली गुल पनाग मान्यताप्राप्त पायलट (certified pilot) आहे. तिला मोटारसायकल चालवण्याचाही आवड असून, ती एक उत्कृष्ट बायकर (biking enthusiast) आहे. गुल पनाग सातत्याने आपल्या व्यायामाचे (fitness) व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. या 41 वर्षीय अभिनेत्रीने आपण कोणतीही फिटनेस अॅक्टिव्हिटी कधीही, कुठेही आणि कोणत्याही पोशाखात करू शकतो, हे दाखवून दिलं आहे. तिने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला असून, त्यात ती साडी नेसून पुश अप्स करताना दिसत आहे. या व्हिडीओला तिने शकिराच्या ‘व्हेनएव्हर, व्हेनएव्हर’ या गाण्याचं कॅप्शन दिलं आहे. सेलेब्रिटिजच्या व्यायाम प्रकारात पुशअप्सचा नेहमी समावेश असतो. अनेकजण तसे फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. पण साडीत पुश-अप्स करणं हे सहजा पाहिलं जात नाही. त्यामुळे गुल पनागच्या या व्हिडीओने तिचे चाहते अतिशय प्रभावित झाले आहेत. तिच्या व्हिडिओवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तिचा हा व्हिडिओ बघून एका चाहत्याने तिला ‘वंडर वूमन’ म्हटलं आहे. तर एकाने तिला बॉस म्हटलं आहे. त्याने ‘आय लव्ह अ गर्ल हू कॅन डू पुशअप्स इन अ सारी! लाईक अ बॉस! अशी कमेंट या व्हिडीओवर केली आहे. अनेक चाहत्यांनी तिचा हा व्हिडीओ बघून प्रेरणा मिळाल्याचंही म्हटलं आहे. अनेक महिलांना विशेषतः आईंनाही प्रेरणा मिळाल्याचं चाहत्यांनी म्हटलंय. गुल पनागचा व्यायामाप्रती असणारा समर्पित भाव बघून चाहत्यांनी प्रशंसा केली आहे.

जाहिरात

या व्हिडिओमुळे गुल पनागची रफटफ गर्लची इमेज अधिक पक्की झाली आहे. चित्रपट सृष्टीतील तिचे सहकारी आणि मित्रमंडळींनीही तिचं कौतुक केलं आहे. दिया मिर्जा, मिलींद सोमणची पत्नी अंकिता कोनावार, अभिनेत्री श्रुती सेठ यांनी गुलच्या पोस्टवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. या आधी गुल पनागने तिच्या मुलाबरोबर व्यायाम करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. त्यात तिचा कुत्रा कसा अडथळे आणत असतो याचंही चित्रण होतं.

गुल पनाग बायपास रोड (Bypass Road) या चित्रपटात शेवटची दिसली होती. तर, या वर्षात ती पाताळलोक (Pataal Lok) या वेबसिरीजमध्ये दिसली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात