Home /News /entertainment /

बॉबी देवलसोबत ब्रेकअप का केलं?; नीलमनं सांगीतलं विभक्त होण्याचं कारण

बॉबी देवलसोबत ब्रेकअप का केलं?; नीलमनं सांगीतलं विभक्त होण्याचं कारण

बॉलीवूड अभिनेता बॉबी देओल आणि अभिनेत्री नीलम याचं प्रेमप्रकरण खुपचं गाजलं होतं. मात्र 5 वर्षानंतर यांच्यात दुरावा निर्माण झाला होता.

    मुंबई, 14एप्रिल- प्रेम,नातं,दुरावा(love life) या गोष्टी आपण सतत आपल्या आजूबाजूला बघत असतो. अनेक लोकं एकमेकांच्या प्रेमात अक्षरशः वेडे होतात. मात्र छोट्या मोठ्या कारणांनी हे लोक वेगळेसुद्धा होतात. बॉलीवूडमध्ये सुद्धा असे अनेक कलाकार आहेत जे कधीकाळी एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडाले (bollywood couple)होते. मात्र वेळेनुसार याचं प्रेम कमी होतं गेलं. आणि यांच्या नात्याला पूर्णविराम(breakup) लागला. अभिनेता बॉबी देओल (bobby deol)आणि अभिनेत्री नीलम (neelam)ही एक अशीच जोडी आहे. कोणतही नातं टिकवण्यासाठी प्रेम आणि विश्वास असणं खूप गरजेचं असतं. एखाद्या नात्यात या दोन्ही गोष्टींचा अभाव असेल तर ते नातं टिकण कठीण असतं. कोणत्याही नात्यात आपण स्वतः समाधानी असणं आवश्यक आहे. मात्र आपल्यला तो समाधान जाणवत नसेल, किंवा त्या नात्यात आधीसारख प्रेम वाटतं नसेल. तर ते नातं अल्पायुषी असतं. काही नाती अशी असतात ज्यात वेळेनुसार सामंजस्य आणि प्रेम वाढत जातं. तर काही नाती अशी असतात ज्यात प्रेम कमी होतं जातं, आणि एकमेकांना समजून घेण्याची मनस्थिती कमी होते. तयमुले काही लोक अशा नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतात. अभिनेत्री नीलमनं असचं काहीसं केलं होतं. नीलम आणि बॉबी देओल तब्बल 5 वर्षे नात्यात होते. हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडाले होते.मात्र वेळेनुसार सर्व काही बदलत गेलं. आणि एकवेळ अशी आली की या दोघांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. एका मुलाखती दरम्यान नीलमनं याबद्दल खुलासा केला होता. नीलमनं म्हटलं होतं. आपलं खाजगी आयुष्य खाजगी राहिलेलं बरं त्याला सर्वांसमोर आणण्याची माझी इच्छा नाही. मात्र अशा काही गोष्टी कानावर येत आहेत त्यामुळे या गोष्टी स्पष्ट करणं भाग आहे. मी आणि बॉबी वेगळे झालो आहोत. हे खरं आहे. एखाद्या नात्यामध्ये आपण समाधानी असणं आवश्यक आहे. मात्र तुम्ही जर तुमच्या नात्यात समाधानी नसाल. तर तुम्ही एकमेकांपासून विभक्त होणे हाच एक पर्याय असतो. पाच वर्षानंतर मला जाणवलं की मी यात समाधानी नाहीय. मला वाटू लागलं की मी पूर्ण आयुष्य या नात्यात खुश नाही राहू शकणार. (हे वाचा: 'बिग बॉस 13' फेम आरती सिंग समुद्रकिनारी झाली TOPLESS; फोटोंमुळे उडाली खळबळ) एका युएसच्या ट्रीपने माझं आयुष्य बदललं. मला पूर्ण जाणीव झाली की मी या नात्यात नाही राहू शकणार. आमचं लग्नं झालं तरी आम्ही आनंदी नाही राहणार. आणि फक्त मलाच नाही तर बॉबीलासुद्धा असचं वाटलं. आणि आम्ही दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय आम्ही परस्पर सहमतीने घेतला आहे. यात आम्ही कोणालाही दोष देत नाही. पूजा भट्ट किना आणखीन कोणी आम्हाला दूर करतेय यात काही तथ्य नाही. आम्ही समंजसपणाने हा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे आमचे कुटुंबीयसुद्धा खुश आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Bobby deol, Bollywood News

    पुढील बातम्या