बॉलिवूड ते छोटा पडदा सर्वच कलाकार सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मालदीवला पसंती देत आहेत. आतापर्यंत जवळजवळ सर्वच कलाकारांनी मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेतला आहे. यातच आता बिग बॉस 13 फेम आरती सिंगसुद्धा मालदीवला गेली आहे. मालदीव किनाऱ्यावरील हॉट फोटोंनी आरती चाहत्यांना घायाळ करत आहे.
आरतीला बोल्ड अंदाजात पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. आरती सिंग फारच कमी वेळा अशा हॉट अंदाजात दिसून येते.
आरती सिंग सध्या आपली आई आणि छोट्या पडद्यावरील अभिनेत्री टीना दत्तासोबत मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे.