मुंबई, 28 मार्च : बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज अनेक वर्षे चित्रपटसृष्टीपासून दूर होत्या. पण आता त्या पुन्हा सक्रिय होत आहेत. त्या त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच त्या काही रिअॅलिटी शोमध्येही हजेरी लावत आहेत. त्यांचे विविध कार्यक्रमांमधील व्हिडिओही व्हायरल होत असतात. या संदर्भात ‘दैनिक जागरण’ने वृत्त दिलंय. ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज या त्यांच्या काळातील सर्वांत सुंदर अभिनेत्रींपैकी एक होत्या. अलीकडेच त्यांनी इन्स्टाग्राम अकाउंट सुरू केलं असून, तिथे त्या त्यांच्या चाहत्यांबरोबर त्यांचे फिटनेस सेशन्स शेअर करत असतात. 75 वर्षांच्या मुमताज यांनी बुधवारी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्या वर्कआउट करताना दिसत आहेत, या वयात मुमताज यांचा असा वर्कआउट पाहून त्यांचे चाहतेदेखील आश्चर्यचकित झाले आहेत. हेही वाचा - राजमहाल सोडला, पळून जाऊन केलं लग्न, बॉलिवूडला धुडकावणारी अभिनेत्री आता 2मुलांची आई मुमताज यांनी शेअर केला वर्कआउट व्हिडिओ ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज यांनी नुकताच त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्या वर्कआउटचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्या इंटेन्स वर्कआउट करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहून मुमताज या वयातही फिट राहण्यासाठी किती मेहनत घेतात, याचा अंदाज लावला जाऊ शकतो. मुमताज यांचा हा व्हिडिओ पाहून चाहते त्यांचं कौतुक करत आहेत. तसेच या वयात फिटनेससाठी त्या घेत असलेल्या मेहनतीनेही ते मोटिवेट झाले आहेत.
त्यांचा व्हिडिओ पाहून चाहते झाले इन्स्पायर चांगल्या आरोग्यासाठी मुमताज यांचं हे डेडिकेशन त्यांच्या चाहत्यांना खूप प्रेरणा देत आहे. त्यांच्या व्हिडिओवर कमेंट करताना एका चाहत्याने लिहिलं की, ‘आणि आम्ही इथे बसून काहीही करत नाही, फक्त इन्स्टाग्राम पाहत आहोत आणि पाय हलवत आहोत’. त्याचवेळी दुसऱ्या युजरने लिहिलं की, ‘प्लीज स्वत:ची काळजी घ्या, तुम्ही कमाल आहात मॅडम.’ या शिवाय त्यांच्या डेडिकेशनचं कौतुक करत अनेक चाहते त्यांच्याकडून प्रेरणा घेत आहेत. त्यांच्या वर्कआउट सेशन्सने चाहते खूपच प्रभावित झाले आहेत.
मुमताज ओटीटीवर करणार पदार्पण 1958 मध्ये आलेल्या ‘सोने की चिडिया’ चित्रपटातून बालकलाकार म्हणून अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या मुमताज त्यांच्या काळातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक होत्या. मुमताज यांनी त्यांच्या अभिनय करिअरमध्ये अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या होत्या. आता त्या पुन्हा बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुमताज दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या हीरा मंडी या वेब सीरिजमध्ये दिसणार आहेत.