मुंबई, 20 मार्च: 2020 मध्ये कोरोनाने हाहाकार माजवला होता. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांना जसा फटका बसला तसाच फटका बॉलीवूडमधील कलाकारांनासुद्धा बसला आहे. काही दिवसांपासून सर्वांचं जगणं पूर्वपदावर येत आहे. बॉलीवूडमध्येही चित्रपटांच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. मात्र 2020बद्दलच्या कटू आठवणी अभिनेत्री क्रिती सेनन हिनं व्यक्त केल्या आहेत.
"क्रितीनं म्हटलं आहे, 2020 हा माझा आयुष्यातील सर्वात वाईट काळ होता. परंतु आता तो काळ निघून गेला आहे. 2021 हे वर्ष माझासाठी खूपच चांगलं आहे असं मला वाटतं. या वर्षाची मानसिक आणि शारीरकदृष्ट्यासुद्धा सुरुवात चांगली झाली आहे."
View this post on Instagram
"गेल्यावर्षी मी माझा चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त होते. त्यानंतर काही दिवसांत लॉकडाऊन पडलं. मात्र एक गोष्ट खूपच चांगली झाली. ती म्हणजे माझे आई-वडील मला भेटण्यासाठी मुंबईला आले होते. मात्र लॉकडाऊन झाल्यानं त्यांना परत जाता नाही आलं. आणि गेली वर्षभर ते माझासोबत राहिले. ते माझासोबत होते म्हणून मला या काळात आधार मिळाला. मला एकटीला ह्या काळात राहणं शक्य नव्हतं.
त्यानंतर मी लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी सोशल मिडियावर सक्रीय झाले होते. मिडियावरून अनेक संवाद साधले. जणू ही एक मोहीमच मी राबवली. मात्र त्यानंतर मी यातून थोडी बाजूला झाले आणि फक्त सोशल मिडियावर सक्रीय राहिले."
(हे वाचा: हार्ट सर्जरीनंतर 'डान्स दिवाने 3' मध्ये सहभागी झालेला रेमो डिसूजा भावुक)
हा तो काळ होता, ज्या घटनेनं बॉलीवूडसह संपूर्ण देशाला हादरवून सोडलं होतं. म्हणजेच 14 जून 2020 सुशांत सिंह रजपूतचं आकस्मित जाणं. यावेळी लोकांनी अनेक आठवणी सोशल मिडियावर ताज्या केल्या. अनेक वादविवाद झाले. हे वादविवाद इतके टोकाला गेले की संपूर्ण वातावरण नकारात्मक झालं होतं. यावेळी मी स्वतःला या गोष्टींपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी माझी मनस्थिती काय होती. हे केवळ मला माहिती होतं. मात्र मला ते सोशल मिडियावर व्यक्तं करण्याची गरज नाही वाटली.
तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही सोशल मिडियावर बोलून किंवा लिहून व्यक्त होऊ शकता. ओरडून, आक्रोश करून सांगण्यापेक्षा तुम्ही अगदी सहजपणे सोशल मिडियावर लिहून व्यक्त होऊ शकता. व्यक्त होण्याचा तो एक सोपा मार्ग आहे. सध्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, क्रितीकडे अनेक चित्रपट आहेत. नुकताच तिनं अभिनेता वरूण धवन सोबत एका चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. येत्या काळात क्रिती अनेक चित्रपटात झळकणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actress, Kriti sanon, Sushant singh raajpoot