मुंबई, 13 जुलै- बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री क्रिती सेनन(Kriti Sanon) पुन्हा एका जबरदस्त कथेसह आपल्या भेटीला येत आहे. सरोगेसी आणि प्रेग्नेन्सीवर आधारित असणाऱ्या बहुप्रतीक्षित चित्रपट ‘मिमी’ (Mimi) चा ट्रेलर (Trailer) आज अखेर रिलीज झाला आहे. चाहत्यांना खुपचं दिवसांपासून या चित्रपटाची प्रतीक्षा आहे. ट्रेलर पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. यावरूनचं क्रितीचा नवा लुक समोर आला होता. सुरुवातीपासूनचं क्रितीचा नवा लुक चर्चेत आहे.
‘मिमी’ या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. यामध्ये दिसून येत आहे. क्रिती एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी आहे. आणि पैशांसाठी ती एका परदेशी जोडप्याच्या मुलाची सरोगेसी मदर व्हायला तयार होते. मात्र काही दिवसांनंतर हे जोडपं आपला निर्णय बदलतात. क्रितीच्या पोटात असलेल्या त्यांच्या बाळाला घेण्यास नकार देतात. त्यानंतर क्रितीच्या आयुष्यात अनेक अडचणी येतात. तिला अनेक घटनांना सामोर जावं लागतं. मात्र यातून बाहेर पडण्यासाठी अनेक मजेशीर गोष्टींचा यात अवलंब केला जातो आणि कथा मजेशीरही बनते. असा हा इंटरेस्टिंग ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. (हे वाचा: बाजीप्रभूंच्या अभूतपूर्व लढतीचा इतिहास; पाहा ‘पावनखिंड’ चित्रपटाचं पहिल पोस्टर ) ‘मिमी’ च्या ट्रेलरमध्ये अभिनेत्री क्रिती सेनन, मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हनकर, अभिनेता पंकज त्रिपाठी आणि अभिनेत्री सुप्रियापाठक यांचा दमदार अंदाज दिसून येत आहे. क्रिती सेननने पहिल्यांदा प्रेग्नेंट महिलेची भूमिका साकारली आहे. ही भूमिका खुपचं आव्हानात्मक असल्याचं तिनं म्हटलं होतं. हा चित्रपट येत्या 30 जुलैला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. ट्रेलर पाहून चाहत्यांच्या खूपच उत्साहपूर्वक कमेंट्स येत आहेत. यावरूनचं चाहत्यांना चित्रपटाची मोठी उत्सुकता असल्याचं दिसत आहे.