मुंबई, 13 जुलै- महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीतील अनेक शौर्यगाथा आपल्याला माहिती आहेत. अशीच एक शौर्यगाथा म्हणजे ‘पावनखिंड’ (Pavankhind) चा थरार. याच पावनखिंडचा थरार आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘पावनखिंड’ हा ऐतिहासिक चित्रपट आपल्या भेटीला येत आहे. 10 जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र देशातील कोरोना परिस्थितीमुळे या चित्रपट प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आज नरवीर बाजीप्रभू यांच्या या पावनखिंड लढतीला 361 वर्षे पूर्ण झाली आहेत. याचं निमित्ताने आज या चित्रपटाचं पहिलं पोस्टर रिलीज(First Poster) करण्यात आलं आहे.
View this post on Instagram
बहुचर्चित ‘पावनखिंड’ या चित्रपटाची सर्वांनाचं मोठी उत्सुकता आहे. मात्र कोरोना परिस्थितीमुळे 10 जूनला प्रदर्शित होणारा हा चित्रपट पुढे ढकलण्यात आला होता. सर्वांनाचं शूरवीर बाजीप्रभूंची ही शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर बघण्याची उत्सुकता आहे. लवकरच हा चित्रपट प्रदर्शितदेखील होणार आहे. मात्र तत्पूर्वी चित्रपटाचं पोस्टर आज रिलीज झालं आहे. आज इतिहासतील महत्वाची घटना मानली जाणाऱ्या ‘पावनखिंड’ लढतीला तब्बल 361 वर्षे पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने आज या चित्रपटाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. अभिनेता चिन्मय मांडलेकरने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे.
(हे वाचा: 'तू तर महाराष्ट्राचा रणवीर सिंग'; अभिजीत खांडकेकरचा हटके LOOK चर्चेत)
अभिनेता चिन्मय मांडलेकरने पोस्टर शेयर करत एक पोस्टसुद्धा लिहिली आहे, ‘१३ जुलै १६६० स्वराज्याच्या इतिहासातील एका अभूतपूर्व लढतीचा दिवस."लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जिवंत राहिला पाहिजे." ही जाणीव असणाऱ्या नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पावनखिंड लढतीला आज ३६१ वर्ष पूर्ण होत आहेत. या दिवसाचं औचित्य साधत माय - बाप रसिक प्रेक्षकांसाठी घेऊन आलोय पावनखिंड चित्रपटाचे पोस्टर! स्वराज्याच्या स्वप्नासाठी उभा जन्म आणि छत्रपती शिवरायांसाठी जीवाची बाजी लावणाऱ्या बाजीप्रभू आणि बांदल सेनेच्या बलिदानाची गाथा 'पावनखिंड'! लवकरच चित्रपटगृहात. अशी पोस्ट लिहित चिन्मयने सर्वांना ही माहिती दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi entertainment