• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Udit narayan ही Kareena Kapoor च्या फ्रेंड्स गँगमध्ये? पार्टीचा फोटो पाहून सर्वजण शॉक

Udit narayan ही Kareena Kapoor च्या फ्रेंड्स गँगमध्ये? पार्टीचा फोटो पाहून सर्वजण शॉक

करीना कपूरच्या पार्टीतील फोटोत (Kareena Kapoor Khan Party) एक असा चेहरा दिसला ज्यामुळे सर्वांचा गोंधळ उडाला.

 • Share this:
  मुंबई, 28 सप्टेंबर ; बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor Khan) आणि तिची पार्टी हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. यावेळी करीनाने तिच्या मित्र-मैत्रिणींना एक  (Kareena Kapoor Khan Party) पार्टी दिली आहे. करीनाच्या पार्टीचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. पण या पार्टीत एका व्यक्तीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या पार्टीत सर्वांना चक्क उदित नारायण (Udit narayan) दिसले. ते इथं काय करते आहे, असाच प्रश्न सर्वांना पडला. सोमवारी करीना कपूर खानने तिच्या घरात एक छोटीशी पार्टी केली.  करीनाच्या या पार्टीमध्ये बहीण करिश्मा कपूर, अमृता अरोरा, संजय मिश्रा, फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा आणि दिग्दर्शक करण जोहरने हजेरी लावली होती. त्याचे फोटो मनिष मल्होत्राने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये एका असा चेहरा आहे ज्याच्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. अनेकांनी या व्यक्तीला पाहून अनेक तर्क वर्तवले आहेत. ही व्यक्ती कोण आहे असा सर्वांना प्रश्न पडला आहे.
  ही व्यक्ती हुबेहुब उदित नारायण यांच्यासारखी दिसते आहे. सोशल मीडियावर हा फोटो पाहिल्यानंतर 'उदित नारायण इथे काय करत आहेत?', 'उदित नारायण देखील करीना कपूरच्या पार्टी गँगमध्ये सामील झाले आहेत', अशा प्रतिक्रिया येत आहेत. उदित नारायणसारखी दिसणारी ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून डिझायनर संजय मिश्रा आहे. करीना कपूरच्या पार्टीत लोकांनी संजयला आधी पाहिले नव्हते, त्यामुळे बेबोच्या चाहत्यांना त्याच्याबद्दल अधिक उत्सुकता लागली होती की, ही व्यक्ती नेमका कोण आहे. हे वाचा -  'तारक मेहता..'फेम या अभिनेत्रीचे बालपणाचे फोटो झाले VIRAL;तुम्ही ओळखलं का या चिमुकलीला? करीना कपूरने यावर्षी फेब्रुवारीमध्ये दुसरा मुलगा जेहला जन्म दिला आणि ती सध्या आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. काम, मुले आणि कुटुंब यांच्यामध्येही करीना नेहमी तिच्या मित्रांसाठी वेळ काढत असते. करीना लवकरच ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात आमिर खानसोबत दिसणार आहे. हा चित्रपट हॉलिवूड चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’चा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केले आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published: