मुंबई, 28 सप्टेंबर- लाडक्या कलाकारांच्या आयुष्याबाबत चाहत्यांना कायमच आकर्षण असतं. त्याची जीवनशैली कशी आहे? त्यांचं ऑफ स्क्रीन आयुष्य कसं असतं, यांसारख्या अनेक गोष्टी जाणून घेण्याबाबत चाहत्यांच्या मनात उत्सुकता असते. हे कलाकार बालपणी कसे दिसत असतील हे जाणून घेण्यासाठीदेखील अनेक चाहते धडपड करत असतात. अशा चाहत्यांसाठीत्या अभिनेत्रीचा आज (28 सप्टेंबर) वाढदिवस आहे. त्या औचित्याने हे फोटोज शेअर करण्यात आले आहेत.
ही अभिनेत्री 'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या लोकप्रिय मालिकेद्वारे घराघरांत पोहोचलेली आहे. ती चाहत्यांची लाडकी आहे आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे मालिकेतल्या जेठालालची ती लाडकी आहे. यावरून तुमच्या लक्षात आलं असेलच, की त्या फोटोंमध्ये दिसणारी ही गोंडस मुलगी दुसरी-तिसरी कुणी नसून 'बबिताजीं'चं पात्र साकारणारी मुनमुन दत्ता (Munmun Dutta) आहे!झी न्यूजने हे फोटो शेअर केले आहेत.
गेल्या कित्येक वर्षांपासून तारक मेहता का उल्टा चश्मा ही विनोदी मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. त्यामधल्या प्रत्येक पात्रानं चाहत्यांच्या मनात आपली एक खास जागा तयार केली आहे. बबिताजींचं पात्रदेखील प्रेक्षकांच्या आवडीचं आहे. अभिनेत्री मुनमुन दत्ता ती भूमिका साकारत असून, आज तिचा वाढदिवस (Munmun Dutta Birthday) आहे. त्या निमित्ताने मुनमुनच्या बालपणीचे फोटो शेअर करण्यात आले आहे. या फोटोंमध्ये दिसणारी मुलगी मुनमुन आहे, हे सहजासहजी ओळखू येत नाही. कारण बालपणाच्या तुलनेत आता मुनमुन एकदम वेगळी दिसते; मात्र तिचा निरागसपणा आणि चेहऱ्यावरील हसू आजही कायम आहे.
(हे वाचा:रणबीरच्या वाढदिवसाला अर्जुन कपूरने आलियाकडे केली खास विनंती; पोस्ट होतेय VIRAL)
तशी मुनमुन दत्ता आपल्या ग्लॅमरस स्टाइलमुळे कायमच चर्चेत असते; मात्र सहकलाकारासोबत असलेल्या रिलेशनशिपच्या अफवांमुळे गेल्या काही दिवसांपासून ती जास्तच चर्चेत आहे. त्यानंतर तिने त्या अफवांना उत्तर देण्यासाठी लिहिलेल्या पोस्टवरूनही बरीच चर्चा झाली. ती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. आज तिच्या बालपणीचे जे फोटो माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहेत, ते तिने पूर्वी एकदा आपल्या इन्स्टाग्राम हँडलवरून थ्रोबॅक म्हणून शेअर केले होते. जेव्हा तिने हे फोटो शेअर केले होते, तेव्हा ते मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.
(हे वाचा:OMG! इतका वयस्कर दिसत आहे 'बिग बॉस'चा हा विजेता; ओळखणंही झालं कठीण)
लहानपणापासूनच सुंदर आणि प्रतिभावान असलेल्या मुनमुनला अभिनयाव्यतिरिक्त गायन आणि संगीतामध्ये रस आहे. बालपणीच्या फोटोंमध्ये मुनमुन दत्ता हार्मोनियम वाजवताना दिसत आहे. एका फोटोमध्ये ती शाळेच्या एका कार्यक्रमात सादर करताना दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये ती खूप लहान दिसत असली, तरी त्यातही ती हार्मोनियम वाजवताना दिसत आहे. यावरून तिला लहानपमापासूनच परफॉर्मिंग आर्ट्समध्ये रस असल्याचं दिसून येतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.