मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Kalki Koechlin: शूटिंगच्या आधी ब्रेस्ट पंप लावून तयार व्हायची अभिनेत्री; थ्रोबॅक फोटो होतोय VIRAL

Kalki Koechlin: शूटिंगच्या आधी ब्रेस्ट पंप लावून तयार व्हायची अभिनेत्री; थ्रोबॅक फोटो होतोय VIRAL

आई झाल्यावर ब्रेस्टफीडिंग करताना अभिनेत्रीला आलेले अनुभव सांगत अभिनेत्रीने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

आई झाल्यावर ब्रेस्टफीडिंग करताना अभिनेत्रीला आलेले अनुभव सांगत अभिनेत्रीने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

आई झाल्यावर ब्रेस्टफीडिंग करताना अभिनेत्रीला आलेले अनुभव सांगत अभिनेत्रीने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  मुंबई 08 ऑगस्ट: बॉलिवूडची एक आघाडीची अभिनेत्री कल्की कोचलिन सध्या तिचं आईपण अगदी आनंदात एन्जॉय करताना दिसत आहे. कल्कीने नुकताच एक थ्रॉबक फोटो शेअर करत शूटिंग लाईफ सांभाळत ती बाळाकडे कसं लक्ष देते याबद्दल काही अपडेट शेअर केले आहेत. त्या फोटोमध्ये तिने शूटिंग करताना ब्रेस्ट पंप लावलेला दिसत आहे. या फोटोमध्ये वर्किंग लाईफ आणि आई असणं नेमकं कसं असतं याची झलक दिसून येत आहे. या फोटोमध्ये तिने ‘मॉम गिल्टस’ बद्दल सांगितलं आहे. यामध्ये ती लिहिते, “मॉम गिल्ट्सच्या आठवणीत, रॅगिंग बूब्स अँड बायोनिक बॉडी”. तिच्या या फोटोवर चाहते भरभरून प्रेम करताना दिसत आहेत. एक युजर तिचं कौतुक करत असं लिहिते, “आम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की तुम्ही जे सगळ्यात बेस्ट आहे ते करायचा प्रयत्न करत आहात. तुमच्या इच्छेचं काम केलं तरच तुम्ही एक चांगला व्यक्ती होऊ शकता. जसे आहात तसेच राहा. तेच तुम्हाला स्पेशल बनवतं.” तर एकजण लिहिते, “प्रत्येक आईसाठी आईपण हे काहीसं कठीण असतं मग ती वर्किंग वूमन असो व नसो. आई होणं सोपी गोष्ट नाही.” अनेक महिला कल्कीच्या या फोटोवर एका शक्तिशाली आईची प्रतिमा दिसत आहे अशा अर्थाच्या कमेंट करून तिचं कौतुक करत आहेत.
  View this post on Instagram

  A post shared by Kalki (@kalkikanmani)

  कल्की आणि अनुराग कश्यप एकमेकांपासून वेगळे झाल्यावर गाय हर्शबर्ग नावाच्या व्यक्तीसोबत कल्की रिलेशनशिपमध्ये होती. त्यांनी ‘सॅफो’ नावाच्या एका मुलीला 2020 मध्ये जन्म दिला. हे ही वाचा- Taapsee Pannu: कॉफी विथ करण कार्यक्रमात न दिसण्याबद्दल बोलली तापसी; 'माझं सेक्स लाईफ...' कल्की आपल्या मुलीचे छोटेछोटे अपडेट्स नेहमीच चाहत्यांपर्यंत शेअर करत आली आहे. कल्कीने नुकतंच एका व्हिडिओमध्ये अभिनेत्री अमृता सुभाषचे सुद्धा आभार मानले आहेत. यामध्ये कल्की आपल्या मुलींना अंगाई म्हणून दाखवताना दिसत आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Kalki (@kalkikanmani)

  ब्रेस्टफीडिंग बद्दल जागरूकता करताना कल्की दिसून आली आहे. तिने नुकत्याच एका व्हिडिओमध्ये सुद्धा समाजात या पद्धतीबद्दल असलेले विचार मांडले आहेत. तिला ब्रेस्टफीडिंग करताना आलेले अनुभव सुद्धा तिने शेअर केले आहेत. ब्रेस्टफीडिंग अर्थात स्तनपान हे आई होताना घडणारं एक वेगळंच ट्रान्सफॉर्मेशन असतं ज्याबद्दल कल्कीने आपले विचार मांडले आहेत. वर्क फ्रंटवर कल्की येत्या काळात ‘मेड इन हेवन’ वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. तसेच तिच्या दोन वेबसिरीजचं शूटिंग सुद्धा संपल्याचं समोर येत आहे.
  Published by:Rasika Nanal
  First published:

  Tags: Bollywood actress, Bollywood News

  पुढील बातम्या