मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /बँडस्टँडचा फेरफटका पडला महागात; अखेर टायगर श्रॉफवर गुन्हा दाखल

बँडस्टँडचा फेरफटका पडला महागात; अखेर टायगर श्रॉफवर गुन्हा दाखल

दिशा पाटनीसोबत मुंबईच्या रस्त्यांवरून फिरल्याने अखेर टायगर वर नियमांचं उल्लघंन केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिशा पाटनीसोबत मुंबईच्या रस्त्यांवरून फिरल्याने अखेर टायगर वर नियमांचं उल्लघंन केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिशा पाटनीसोबत मुंबईच्या रस्त्यांवरून फिरल्याने अखेर टायगर वर नियमांचं उल्लघंन केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई 3 जून: अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या रस्त्यावर नियमांचं उल्लघंन करत फिरत होता. त्याच्या या फेरफटक्यामुळे तो बराच चर्चेत आला होता. अभिनेत्री दिशा पाटनीसोबत (Disha Patani) तो गाडीतून फिरताना दिसला. त्यावेळी पोलिसांनी त्यांची गाडी अडवली होती. विचारपूस केल्यानंतर त्या दोघांना सोडून देण्यात आलं होतं. मात्र आता त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

1 जूनच्या संध्याकाळी टायगर आणि दिशा मुंबईतील, वांद्रे येथील बँडस्टँडवर (Bandstand) राउंड मारत होते. गाडीत टायगर आणि दिशा दोघेही होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांची विचारपूस केली होती. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं होतं. पण आता कलम 188 नुसार कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी टायगरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई तसेच देशभरात सध्या कोरोनाने (Corona pandemic) थैमान घातलं आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत कडक निर्बंध लागू आहेत. तर विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. अशातच दिशा आणि टायगर बाहेर फिरत असल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

दिशा आणि टागगर यांनी ‘बागी 2’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. दोघेही बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध जोडी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या रिलेशनशिप विषयी अनेकदा चर्चा होतं असते. मात्र त्यांनी कधीही उघडपणे त्यांच्या नात्याची कबूली दिली नाही. काही दिवसांपूर्वी मालदीव ट्रिपमुळे दोघेही चर्चेत आले होते. कोरोनाकाळात मालदीवला गेल्यामुळे त्यांच्यासह अनेक सेलिब्रिटींवर टीका करण्यात आली होती.

दिशा पाटनीसोबत मुंबईच्या रस्त्यांवर फिरत होता टायगर श्रॉफ; पोलिसांनी अडवली गाडी आणि..

सध्या टायगर ‘हिरोपंती 2’ (Heropanti 2) या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तो अभिनेत्री तारा सुतारीयासोबत (Tara Sutaria) दिसणार आहे.  याशिवाय तो ‘गणपत’ या चित्रपटातही दिसणार आहे.

First published:

Tags: Disha patani, Entertainment, Tiger Shroff